पूर्वी मंत्री म्हटलं की लाल दिव्यांची गाडी मिळायची तो एक रुबाब असायचा पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्या च्या गाडी वरील लाल दिवा काढून घेण्याचा निर्णय घेतला.
मात्र मुंबईत राज्यातील राज्यमंत्री कॅबीनेट मंत्री यांना राहायला निवासस्थान मिळते. कॅबिनेट मंत्र्याना तर प्रशस्त बंगला मिळतो तेथे सरकारी नोकर चाकर स्वयंपाक करणारे अशांची सेवा मिळते.
मात्र एकदा का मंत्री पद गेले की बांगला पंधरा दिवसात रिकामा सोडावा लागतो असा नियम आहे.जर तो सोडला नाही तर भाडे व दंड दोन्ही आकारण्यात येते.
असाच एक प्रकार राज्यात घडला राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. या गोष्टीला पाच महिने उलटून गेले मुंडे यांच्या कडील खाते छगन भुजबळ यांच्या कडे आले मात्र माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अद्यापही त्यांचा सरकारी बंगला अजून सोडला नाही.
धनंजय मुंडेंनी राजीनाम्यानंतरही बंगला सोडला नाही
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा देवून बरेच दिवस झाले आहेत. पण त्यांनी अद्यापही त्यांचा शासकीय बंगला सोडलेला नाही.
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपद सोडून साडेचार महिने झाले आहेत. पण त्यांनी अजून त्यांनी शासकीय बंगला सोडलेला नाही. त्यामुळे त्यांना 42 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची चर्चा आहे.
मंत्री छगन
भुजबळ बंगल्याच्या प्रतिक्षेत
धनंजय मुंडे यांनी बंगला न सोडल्यामुळे त्यांच्याजागी आलेले मंत्री छगन भुजबळ हे अजूनही शासकीय बंगल्याच्या प्रतिक्षेत आहेत. सरकारी बंगला न मिळाल्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांचा अद्यापही गृहप्रवेश झालेला नाही.
धनंजय मुंडेंनी बंगला का सोडला नाही?
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी वैद्यकीय कारणास्तव हा बंगला मागितला. आपण मुदतवाढ मागितली तर मुदतवाढ मिळू शकते,असं त्यांचं म्हणणं असल्याची चर्चा आहे.