राज्य मंत्री मंडळाचा विस्तार कधी होईल या प्रश्नावर पुन्हा आमदार बच्चू कडू संतापले वारंवार मंत्रिमंडळ विस्तारा बाबत प्रश्न विचारल्याने जर मंत्रिपद घेण्यासाठी कागद आला तर तो फाडून टाकीन यापूर्वी देखील विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात त्यानी चुलीत गेलं बे मंत्रिपद असे म्हणत ‘मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणारच’ असे म्हटले होतेआणि प्रसार माध्यमांशी देखील बोलतांना सांगितले होते की आता मंत्रिपद भेटत असेल तरी घेणार नाही तरी प्रसार माध्यमे पुन्हा पुन्हा त्याच विषयाचा प्रश्न मांडतात.त्यामुळे बचवहू कडू हे नाराज झाले.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या मागील अधिवेशनानंतर राज्य सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होईल, असं बोललं जात होतं. मात्र मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रीमंडळ विस्तार होईल, असा दावा राजकीय वर्तुळातून केला जात आहे. याबाबत विचारलं असता प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रीपद मिळालं तरी घेणार नाही. मंत्रीपदाच्या शपथीचा कागद फाडून टाकेन, असं मोठं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.