एक उत्तम अभिनेता व उत्तम वक्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने २०१९ ला डॉ.अमोल कोल्हे याना उमेदवारी दिली ते निवडूनही आले पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर मात्र त्यानी खा.शरद पवार यांच्या सोबत रहाण्याचे ठरवले त्यामुळे संतापलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हे याना पडणारे म्हणून आव्हान दिले.
राजकारणात कोणी कोणाचे नसते,कायम मित्र व कायम शत्रू
कधी कोणाचे सूट जुळेल,कधी कोणाचे बिनसेल सांगता येत नाही.
कांडा व दुध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन खासदार डॉ अमोल कोल्हे खा.सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशादयक्ष जयंत पाटील यांनी शिवनेरी गडाच्या पायथ्या पासून शेतकरी संघर्ष यात्रा काढली ती यात्रा बारामतीत पोहचली तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता डॉ.अमोल कोल्हे यांनी पवार याच्यावर टीका केली.
आपली भाषणात
अमोल कोल्हे म्हणाले, वाघ आपल्याला खुप आवडतो, जेव्हा तो जंगलात वावरतो तेव्हा तो जंगलचा राजा असतो, जेव्हा सर्कशीत तोच वाघ जेव्हा रिंगमास्टरच्या इशा-यावर कसरती करतो, तेव्हा काळजाला घरे पडतात, की ज्या वाघावर प्रेम केल, त्याला आज रिंगमास्टरच्या इशा-यावर चालाव लागत, जेव्हा हाच वाघ पिंज-यात बघायला मिळतो.
तेव्हा काळजाला घरे पडतात की याच्या डरकाळीने भल्या भल्यांचा थरकाप उडत होता, त्याला पिंज-याच्या आडून फक्त गुरगुराव लागत, कुणीही येणार जाणार त्याला दगड मारु शकत…ही भावना जेव्हा वाघाची होते, असच महाराष्ट्राच्या हितासाठी डरकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशा-यावर तोंडातून शब्द काढत नाहीत तेव्हा ही भावना मनात जागी होते.
वतन वाचवायच असल्याने मांडलिकत्वाची भावना स्विकारुन दिल्लीश्वराच्या नजरेला नजर भिडवून माझ्या महाराष्ट्राचे नुकसान का करताय हे विचारण्याची हिंमत राहिली नाही, असा घणाघाती आरोप करत वतन वाचवायची तर ही धडपड नाही ना अशी शंका येते.