प्रतिनिधी -( संदीप ढाकुलकर पुणे)
पुणे जिल्हा राष्ट्रवादी क्रीडा संघटनेच्या अध्यक्षपदी श्री स्वप्नील ढमढेरे यांची निवड करण्यात आली.
यशवंतराव चव्हाण सभागृह पी डी सी सी बँक मुख्य कचेरी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा ग्रामीण पक्षाची मिटिंग संपन्न झाली, क्रीडा क्षेत्रातील कामगिरी पाहता व राज्य शासनाचा मानाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळालेला आहे, त्या सोबत देश पातळीवरील कामगिरी व अंतराष्टीय पातळीवरील क्रीडा क्षेत्रातील कामगिरी पाहता मा. उपमुख्यमंत्री श्री.अजित दादा पवार यांच्या अनुमतीने आज जिल्हा क्रीडा अध्यक्ष पदी निवड केली गेली.यावेळी मा. प्रदीप दादा गारटकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जिल्हा बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे,प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आण्णा घुले, महिला अध्यक्ष मोनिका हरगुडे, युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, विद्यार्थ्याध्यक्ष करण कोकणे, कात्रज दूध संघाचे चेअरमन भगवान बापू पासलकर, पिडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, मा. रवी बाप्पू काळे अध्यक्ष शिरूर तालुका, गोपाळ अण्णा म्हस्के संचालक पुणे जिल्हा दूध संघ, निखिल तांबे संचालक पुणे जिल्हा दूध संघ, कालिदास गोपालघरे, संचालक पुणे जिल्हा दूध संघ, श्रीनिवास घाडगे उप अध्यक्ष पुणे जिल्हा, राजेंद्र घावणे जिल्हा उप अध्यक्ष, तृप्ती सरोदे महिला प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस सौ.. आरती ताई भुजबळ महिला अध्यक्ष शिरूर तालुका,
अमोल वरपे युवक अध्यक्ष शिरूर, अमित गव्हाणे विधार्थी अध्यक्ष शिरूर, श्रुतिका झाबंरे अध्यक्ष महिला शिरूर शहर.पक्षाची महत्वाच्या विषयांवर बैठक आयोजित केली होती.
1. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पक्ष संघटनेत आवश्यकतेनुसार फेरबदल करणे 2. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा अजित क्रीडा महोत्सव २०२४ चे पूर्व नियोजन करणे 3. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बूथ रचना आढावा घेणे याकरिता ही बैठक आयोजित केलेली होती तरी मोठया संख्येने पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित राहिले होते. जिल्हा क्रीडा संघटनेच्या