आर्णी तहसील कार्यालया समोर शेतकऱ्याच्या प्रश्नावर जागल आंदोलन करण्यात आले या अंडीलनत सहभागी होत
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधानपरिषद सदस्य माजी आमदार ख्वाजा बेग यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला.
१ रुपयात पीकविमा काढला मात्र नुकसान भरपाई ची रक्कम मात्र ४०-५० फुप्ये मिळाली
तो चेक लिहतांना चेक लिहणाऱ्या लोकांना लाजा कशा वाटल्या नाही असे मत व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झाल्या नंतर पहिल्यांदा ख्वाजा बेग यांनी हे सार्वजनिक वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून ख्वाजा बेग याच्या रसजकीय भूमिकेकडे जिल्ह्य राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे ख्वाजा बेग हे यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (एकत्र)अध्यक्ष सुद्धा होते.
