डॉ राधाकृष्ण उच्च प्राथमिक शाळेच्या आनंद मेळाव्याला माजी गटशिक्षणाधिका-याची हजेरी
स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कमवा आणि शिका अशी उत्तम शैक्षणिक परंपरा सुरू केली होती.यांचा आदर्श घेत मोनिस शेख यांनी मसाला चना विक्रीतून ७०० रुपये मिळवले
‘आनंद मेळ्यात मोनिस यांच्या स्टॉल ला भेट देत विद्यार्थ्यांनी मसाला चणा चा आस्वाद घेतला.
शाळेच्या प्रांगणात रंगला आनंद मेळावातुन विद्यार्थाचा अर्थशास्त्राचा खेळ
लहान मुलांनी आर्थीक व्यवहार नेमका कसा करावा यासाठी शाळेतील शिक्षकांनी शाळकरी विद्यार्थाना चलनाची देवान घेवान कशी करावी यासाठी आज दि३०/१२/२०२३ रोजी डॉ. राधाकृष्ण उच्च प्रार्थमिक मराठी शाळा आर्णी येथे, आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या मेळाव्यात सर्व वर्गातील निवड केलेल्या विद्यार्थांना आपल्या घरुनच खाद्यपदार्थ विक्री करण्यासाठी आनंद मेळाव्यात स्टॉल वर विक्री करण्यासाठी ठेवण्यात आले होते विषेश करुन याच शाळेत वर्ग नव्या मध्ये शिकत असलेला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष युनुस शेख यांचे चिरंजीव मोनिस शेख याने चना मसाला चे स्टॉल लावून शाळकरी मुलांचे तथा पालक वर्गाचे लक्ष वेधून घेतले होते, त्या चना मसाला स्टॉल ला सेवानिवृत्त गट शिक्षण अधिकारी मा.किशोर रावते साहेब यांनी आपल्या कुटुंबासह व शाळेच्या मुख्याध्यापिका काटोले मॅडम व पवार मॅडम,भोयर सर, सेवानिवृत्त भेंडे सर आणि शाळेतील संपूर्ण असलेला स्टॉप ने भेट देऊन मोनिस शेख चे सगळ्यात चांगले व देखणी स्टॉल असल्याचे कौतुक करुन पुढील शैक्षणिक गुणवत्ते करिता शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मोनिस शेख चे पालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष युनुस शेख हे प्रामुख्याने उपस्थित होते,
