प्रतिनिधी संदिप ढाकुलकर
लुंबिनी बुद्ध विहार कोयाळी पुनर्वसन गावठाण शिक्रापूर येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची १९३ वी जयंती उत्साहात संपन्न
बुधवार दि. ०३ जानेवारी २०२४ रोजी लुंबिनी बुद्ध विहार कोयाळी पुनर्वसन गावठाण शिक्रापूर येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त बहुजन परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष आयु. अशोक सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रथमतः क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस शिक्रापूर ग्रामपंचायत सदस्या आदरणीय सौ. पूजाताई भुजबळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी शुभ्रा सोनवणे, श्रेया सोनवणे या बालिकांनी सावित्रीमाई फुले यांच्या वेशात सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषण केले.
ग्रामपंचायत सदस्या सौ. पूजाताई भुजबळ यांनी ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनकार्याविषयी आपले मनोगत व्यक्त करताना आजही महिलांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे. सावित्रीमाई फुलेंच्या असीम त्यागामुळेच आजच्या महिला सक्षम झाल्या असून सर्व क्षेत्रात महिलांची कामगिरी कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार काढले. यावेळी स्वातीताई गायकवाड, बौध्दाचार्य पोपट सोनवणे, वसुदेव आंभोर, मुकेश गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. अशोक सोनवणे आपल्या अध्यक्षीय भाषणात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास महिलांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती. त्यामध्ये सुमन आनंदराव सोनवणे, राधा गंगाराम पवार,अरूणा ओव्हाळ, वैष्णवी सोनवणे, स्वाती सोनवणे, स्वाती गायकवाड, श्वेता सोनवणे, दीक्षा काटे, संगीता सोनवणे , प्रीती सोनवणे, अश्विनी सोनवणे, अंजली खोब्रागडे या महिला उपासिका उपस्थित होत्या. वसाहतीतील बहुजन परिवर्तन संस्थेचे कोषाध्यक्ष सुनिल सोनवणे व आंबेडकर युवा संघाचे राहुल काटे, आनंदराव सोनवणे,दिपक सोमनाथ भुजबळ गंगाराम पवार, नितीन सोनवणे, सिध्देश सोनवणे, भावेश सोनवणे, विवेक सोनवणे, वसुदेव आंभोर, शांताराम सोनवणे, चंद्रशेखर डांभोडे, प्रमोद बडोले,जय सोनवणे, ओंकार सोनवणे आदी उपासक उपस्थित होते. सुनिल सोनवणे, मुकेश गायकवाड, नितीन सोनवणे, गंगाराम पवार,अनिल सोनवणे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुपचे मुख्य प्रवर्तक आयु. मुकेश गायकवाड यांनी केले. तर आभार आयु. गंगाराम पवार यांनी आभार मानले.