महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात नवा ट्रेंड जन्माला आला असून आधी वाद निर्माण होईल भावना दुखावतील असे बोलून जायचे मग खेद व्यक्त करायचा आणि चर्चेत राहायचे असा नवा पायंडा पडत चालला आहे.
नुकताच एका कार्यक्रमात शरद पवार गट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम हे वनवासात असतांना शिकार करून खाययचे असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याविरुद्ध राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या भाजप कडून ठिकठिकाणी आव्हाड याचा निषेध करून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यावर आज पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र आव्हाड यांनी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो पण आपण वाल्मिकी रामायणातील डोह्याचा संदर्भ दिला होता अशी पुष्टी देखील केली. तर दुसरीकडे राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यावर चांगलाच वाद निर्माण झाला नंतर सारवा सारव करत विरोधकांनी कार्यक्रम उधळण्याचे षडयंत्र असल्याचे सांगत आपली भाषा ही स्थानुक होती तरी खेड व्यक्त केला.
वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारे मंत्री अब्दुल सत्तार यांनी आणखी एक चुकीचं विधान केलं आहे. सत्तारांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या तरुणांवर लाठीजार्च करण्याचं आवाहन त्यांनी पोलिसांना केलं. यावेळी त्यांनी केलेल्या शब्दप्रयोगामुळे संताप व्यक्त झाला आणि विरोधकांनी सरकार वर हल्ला केला
छत्रपती संभाजी नगरमधल्या सिल्लोड येथे बुधवारी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. कार्यक्रम सुरु असताना काही तरुणांनी गोंधळ घालून हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. तरुणांचा गोंधळ वाढल्यानंतर काहीवेळ कार्यक्रम थांबवावा लागला.
