दिव्यांगांचे मसीहा असलेले,शेतकरी, शेतमजुरांची, कामगार,उपेक्षित शोषित घटकांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाणारे म्हणून आमदार बच्चू भाऊ कडू यांची ओळख आहे.
आजवर संपूर्ण राज्यात अपना भिडू,बच्चू कडू ह्या घोषणा देतात आता अचलपूर विधानसभा मतदारसंघात बच्चू भाऊ की छाव मे विकास अपणे गावं मे हे नवे घोष वाक्य पुढे आले आहे.त्याचे झाले असे की बच्चू कडू हे पूर्वीच्या सरकार मध्ये राज्यमंत्री होते.पण शिवसेनेतील बंडा नंतर बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिला. आणि त्या बदल्यात ते ज्या दिव्यांगाच्या प्रश्नावर गेली २५ वर्ष लढत आले आहेत त्यातील एक मागणी म्हणजे राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय आणि ही मागणी युती सरकारने पूर्ण केली दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय असणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे हे विशेष.राज्यभर प्रहार जनशक्ती पक्षाच्या विस्तारासाठी, विविध कार्यक्रम, आणि आंदोलनास वेळ देऊन काम करणाऱ्या बच्चू कडू याचे मतदार संघाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न असतात
सरकार कोणाचेही असो विकास निधी कसा खेचून आणायचा हे कडू यांना चांगलेच समजते म्हणूनच ‘कडू’ हे मतदारसंघात ‘गोड’ ठरले आहेत म्हणूनच ते ४ वेला अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
ते सिंचन राज्यमंत्री असतांना त्यानी अचलपूर मतदारसंघात रखडलेल्या अनेक सिंचन प्रकल्पास सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली.
आताही मतदार संघात शहर व ग्रामीण भागातील खेड्यात सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रचंड निधी विविध विभागाकडून खेचून आणण्यात बच्चू कडू हे ब्रँड ठरले आहेर
महा युतीच्या सरकार कडून अचलपूर मतदार संघात १००० कोटी रुपयांचा विकास निधी कडू यांनी मंजूर केला त्यातील १८ कोटी ७४ लाखाचा विकास निधी दिल्याने करजगावात बच्चू कडू यांच्या बद्दल आभार व्यक्त करण्यात येत आहे.
