7k Network

५१ वे शिक्षकेतर अधिवेशन होणार सिंधुदुर्गात

(प्रतिनिधि संदिप ढाकुलकर) “शिक्षकेतर अधिवेशन सिंधुदुर्ग येथे होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे ५१ वे राज्यस्तरीय अधिवेशन सिंधुदुर्ग येथे संपन्न होणार असल्याची माहिती शिरूर तालुका शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलराव गवारी यांनी दिली .
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे ५१ वे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न होत आहे . दि ७ जानेवारी २०२४ रोजी जिमखाना मैदान सावंतवाडी ,जिल्हा सिंधुदुर्ग येथे संपन्न होईल .या अधिवेशनामध्ये माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी बांधवांच्या प्रलंबित प्रश्नावर विचार विनिमय , चर्चासत्र आणि परिसंवाद होणार आहेत .त्यानिमित्त अनेक तज्ञ विचारवंतांचे मार्गदर्शन होणार आहे .त्याचप्रमाणे राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती , प्रगती योजना , अनुकंपा तत्वावरील पदांची नियुक्ती ,जुनी पेन्शन योजना वैद्यकीय , रजा देयके असे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत .यावर चर्चा आणि विचार विनिमय करून हे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत .याशिवाय संघटनेची पुढील ध्येयधोरणे ठरविण्यासाठी मंथन होणार आहे .
या अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर , केंद्रीय मंत्री नारायण राणे , सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण ,खासदार विनायक राऊत , शिक्षक आमदार विक्रम काळे , जयंत आसगावकर , आमदार वैभव राऊत ,रवींद्र धंगेकर ,नितेश राणे , रमेश पाटील , पदवीधर आमदार निरंजन डावखरे ,सत्यजित तांबे ,ज्ञानेश्वर म्हात्रे , माजी खासदार सुधीर सावंत यांसह मान्यवरउपस्थित राहणार आहेत .या अधिवेशनासाठी राज्यातील सर्व शिक्षकेतर बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर , पुणे विभागीय सचिव डॉक्टर गोवर्धन पांडुळे , जिल्हाध्यक्ष भीमाशंकर तोरबल ,जिल्हा सचिव भानुदास दळवी यांनी केले आहे .

” शिक्षकेतर कर्मचारी हे माध्यमिक शाळा व्यवस्थेतील महत्वाचा घटक आहेत . मात्र शासनाच्या धोरणांमुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत . त्यामुळे एकूणच शिक्षण व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होत आहेत . संघटनेच्या माध्यमातून शिक्षकेतरांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहीन .” – विठ्ठलराव गवारे – अध्यक्ष शिरूर तालुका माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटना.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!