7k Network

अभिंयंता सागर घोडेराव यांना वास्तुविशारद पदवी प्रदान

*अभिंयंता सागर घोडेराव यांना वास्तुविशारद पदवी प्रदान

आर्णी:- आर्णी शहरातील सुप्रशिध्द स्थापत्य अभियंता सागर घोडेराव यांना पुणे येथिल ज्योतिष्य वास्तु विश्व संशोधन केंद्र
पुणे महाराष्ट्र आयोजित वास्तु विशारद या अभ्यासक्रमा मध्ये प्रवेश घेऊन अभियंता सागर घोडेराव यांनी यांनी तो यशस्वी रीत्या पुर्ण केला असुन संस्थेकडून घेण्यात आलेल्या परीक्षे मध्ये ५०० पैकी ४९० गुण प्राप्त करून बॅच क्रमांक ९ मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच अंकविशारद हा अभ्यासक्रम पुर्ण केला आहे त्यांना संस्थे कडुन वास्तुविशारद पदवी व अंकविशारद प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ह्या सुप्रसिद्ध अध्यात्मिक एवं ज्योतिष लेखिका गूरूश्री प्रियाताई मालवणकर तर कार्यक्रमाचे
अध्यक्षस्थानी ज्योतिष शलाका जयश्रीताई बेलसरे तसेच फल ज्योतिष संस्थेचे विजय जकातदार व प्रसिद्ध लेखक बबन पाटील हे मान्यवर उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते वास्तुविशारद व अंकविशारद च्या सर्व विद्यार्थ्यांना पदवी व प्रमाणपत्रे देण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष वेदमूर्ती, वास्तुभुषण, डॉ. उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांनी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त केले लोकानाम हितकाम्यया या तत्वावर आधारित संस्थेकडुन प्रत्येक घरात वास्तुशास्त्र पोहचवण्याच्या हेतुने हे अभ्यासक्रम आयोजित केले जात असुन प्राचीन वास्तुशास्त्र घराघरा पर्यंत पोहचवावे हाच मुख्य उद्देश आहे असे मत त्यांनी व्यक्त करुन त्यांनी यशस्वी विद्यार्थाचे अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!