आदिवासी काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय समन्वयक श. के. राजु यांच्या उपस्थितीत दिल्लीतील राष्ट्रीय कार्यालयात एका बैठकीचें आयोजन करण्यात आले होती. या बैठकीत आदिवासी काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री अँड शिवाजीराव मोघे यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितीती होती.
. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या “भारत जोडो यात्रेचे फलित तेलंगणात विधानसभा निवडणुकीत आलेल्या यश असल्याचे मत शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केले. या यशाचा आनंदोत्सव सुध्दा यावेळी साजरा करण्यात आला. आगामी काळातील सर्व निवडणुका आणि “भारत जोडो न्याय यात्रेच्या” नियोजनावर यावेळी चर्चा करण्यात आली. प्रसंगी आदिवासी काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते..
