लोकसभा २०२४ च्या निवडणूक जशा जशा जवळ येत आहेत तशा युती व आघाडीच्या जागा वाटपाचा मार्ग मोकळा होण्यासाठी बैठकांचा धडाका लागला आहे.सर्वच पक्षांनी प्रामुख्याने भाजप व काँग्रेस कडून अंतर्गत सर्व्हे सुद्धा झालेले आहेत ‘अबकी बार ४०० पार’हा नारा भाजपकडून दिल्याने बहुतांश जागा भाजप कमळावर लढणार हे स्पस्ट आहे पण महाराष्ट्र राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी फोडलेली शिवसेना, राष्ट्रवादी यातून जन्माला आलेल्या महा युतीत सुद्धा जगावतपात ‘मोठा भाऊ’ म्हणून भाजपच असणार असल्याची चर्चा असून राज्यरील ४८ पैकी ३२ जागांवर भाजप कमळावर लढणार असल्याची प्राथमिक माहिती असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १२ जागा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ ६ जागा सोडण्याचा प्राथमिक चर्चा झाल्याचे वृत्त असून यामुळे ‘दादांची’ ‘दादागिरी’ आता लोकसभा जागा वाटपात दिसणार नसल्याचे चित्र सद्या तरी दिसत आहे.
