येत्या २२ जानेवारीला अयोध्येत विश्व हिंदू परिषद यवतमाळ प्रांतास अन्न छत्र लंगर सेवा देण्याचे भाग्य लाभले असून ही संधी श्री राम जन्मभूमी न्यासाचे वतीने देण्यात आला आहे
देश भारतातून रामजन्मभूमीत मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात येणाऱ्या भक्तांच्या भोजनाची सेवा यवतमाळ विश्व हिंदू परिषद कडून दिल्या जाणार आहे. त्यासाठी अयोध्येतील सरस्वती विद्या मंदिराचे प्रारंगणात सेवा करण्यासाठी राम जन्मभूमी न्यासा कडून ही जागा अन्न छत्रासाठीदेण्यात आली आहे.यासाठी विहिप व बजरंग दलाच्या वतीने जिल्ह्यातून अन्न धान्य संकलनाचे काम जोरात सुरू असून आता पर्यंत २०० क्विंटल धान्य संकलन झाल्याची माहिती यवतमाळ जिल्हा बजरंग दलाचे सचिव राम लोखंडे यांनी दिली.
ही एक प्रकारची जिल्ह्यातील राम भक्तांच्या साठी मिळालेली संधी आहे असेही विश्व हिंदू परिषद मधून सांगण्यात येते.
