येत्या २० जानेवारीला मुंबईत आंदोलन करण्याचा भूमिकेवर ठाम असलेल्या मनोज पाटिल जरांगे यांच्या भेटीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू हे अंतरवली सराटी जिल्हा जालना येथे आले होते यावेळी जरांगे पाटील व आमदार बच्चू कडू याच्यात प्रदीर्घ चर्चा झाली यावेळी माध्यमांशी संवाद साधतांना बच्चू कडू म्हणाले मीही आंदोलक असून मनोज पाटील यांच्या आंदोलनात मीही सहभागी होणार आहो.कारण मीही आंदोलक असून मनोज पाटलांनी मुंबईत आंदोलन करू नये असे मी म्हणणार नाही असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे तरीही सरकारने तातडीने खास बाब म्हणून निर्णय घेतल्यास २० तारखेच्या संभाव्य आंदोलनावर तोडगा काढला जाऊ शकतो असा अंदाज असून मनोज पाटील मात्र मुंबईत आंदोलनावर ठाम आहेत व मराठा समाजाने सुद्धा तयारीत रहावे असे मनोज पाटील जरांगे म्हणाले.
