*प्रहार जनशक्ती पक्षाचे पुंगी बजाव आंदोलन*
उदगीर:उपजिलाधिकारी कार्यालया समोर प्रहार जनशक्ती च्या वतीने दि.२५/१२०२४ रोजी पुंगी बजाव आंदोलन .
उदगीर व जळकोट तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद करणे बाबत चे निवेदन देऊन ही
उदगीर व जळकोट तालुक्यातील अंवेध धंदे बंद होत नाहीत सर्व सामान्य जनतेचे संसार उध्वस्त करणा-या अवैध धंदे विषयी उदगीर व जळकोट शहरी व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असून ते उदगीर व जळकोट तालुक्यातील संबंधीत पोलीस स्टेशन ठाण्याअंतर्गत येणा-या परिसरात प्रामुख्याने मटका, जुगार, अवैध दारु विक्री, हातभट्टट्टी दारु, राशन काळया बाजारात विकणे, अवैध गुटख,अवैध वाहतूक ऑनलाईन लॉटरी, वैश्या व्यवसाय, अवैध्य वाळू, अवैध राज्य गोणखणीज, अवैध धंदे मोठया जोरात उदगीर व जळकोट तालुक्यात सुरु आहेत, यामुळे उदगीर व जळकोट तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात चोरी, डाके, मारहान, महीलांची छेडछाड, कौटुंबीक कलह, गावातील भांडणे आदी प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून उदगीर व जळकोट तालुक्यात शांतता भंग पावली आहे, या संदर्भात उदगीर व जळकोट तालुक्यातील अवैध धंदे चालविणा-यावर आपल्या स्तरावरुन कार्यवाही करुन संबंधीत पोलीस अधिकारी यांना आदेशीत करावे.असे निवेदन दि.7/9/23 रोजी उपजिलाधिकारी साहेब यांना निवेदन दिले असता त्याच्या कार्यालयातून निवेदनाची दखल घेत दि.२१/१/२३ रोजी संबंधित अधिकारी यांना नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी असे पत्रक उपजिलाधिकारी यांनी काढले असताना देखील उपजिलाधिकारी यांच्या पत्रक ची दखल नघेणारया अधिकारी यांची चौकशी करुन नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी यासाठी दि.२५ जानेवारी वार गुरुवार रोजी उपजिलाधिकारी कार्यालया समोर पुंगी बजाव आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे असे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे व प्रहार पदाधिकारी यांच्या वतीने उपजिलाधिकारी साहेब यांना
देण्यात आले .
तरी मे. साहेबानी आपल्या स्तरावरुन त्वरीत अवैध धंदे तात्काळ बंद करुन पोलीस प्रशासनास आदेशीत करावे व यासाठी संबंधीत अवैध धंदेवाल्यांना अभय देणा-या पोलीस अधिकारी व राज्य उत्पादक अधिकारी यांचीही सखोल चौकशी करुन तात्काळ कार्यवाही करावी. अशी मागणी उदगीर व जळकोट तालुक्यातील जनता करीत आहे.यासाठी दिनांक २५/१/२४वार शुक्रवार रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालया समोर संबंधित अधिकारी यांच्या नावाने पुंगी बजाव आंदोलन करण्यात येणार आहे.
सोबत प्रहार चे निवेदन दिलेले प्रत व आपल्या कार्यालयातून संबंधित अधिकारी यांना दिलेले पत्रक जोडून देण्यात आले.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे,जिल्हा प्रवक्ते बंडेपा पडसलगे ,तालुका अध्यक्ष रविकिरण बेलकुंदे,शहर अध्यक्ष महादेव मोतीपवळे,तालुका कार्याध्यक्ष महादेव आपटे, महिला जिल्हा उपाध्यक्षा प्रेमलता भंडे, महिला अध्यक्ष विजयमाला पवार,शहर अध्यक्ष राजश्री पाटिल , तालुका उपाध्यक्ष संदीप पवार,तालुका संघटक सोपान राजे ,शहर कार्याध्यक्ष शाहाजान शेख ,शहर उपाध्यक्ष मोहम्मद चौधरी, तालुका चटणीस बलिराम चौधरी ,शहर सचिव बालाजी बिरादर ,तालुका प्रसिध्दीप्रमुख अभय कुलकर्णी, तालुका संघटक आनंद गव्हाणे ,तालुका सरचिटणीस श्रीदेवी बिरादर, तालुका सरचिटणीस सुदर्शन सूर्यवंशी ,शहर उपाध्यक्ष इमरान शेख ,शहर सहसंपर्क शोएब शेख,रेखाताई, सुल्तान कादरी, मुस्सा कादरी,सुहेल कादरी,परवेज कादरी, यांच्या उपस्थितीथ देण्यात आले..
