मदगी मातंग समाज अल्पसंख्याक असून अजूनही समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे शिक्षणा शिवाय समाजाची उन्नती अशक्य आहे केवळ शिक्षण नसल्याने सामाजिक स्थिती मागासलेली आहे असे मत राज्याचे माजी समजून न्याय मंत्री शिवाजी राव मोघे यांनी व्यक्त केले.
आर्णी – केळापूर विधानसभा मतदारसंघातील जगदंबा देवस्थान केळापूर येथे आज मादगी मातंग समाजाचा भव्य प्रबोधन मेळावा पार पडला. या वेळी ते बोलत होते. या मेळाव्यास अध्यक्ष म्हणुन आदिवासी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड शिवाजीराव मोघे साहेब उपस्थित होते. मादगी – मातंग समाजात शिक्षणाचा अभाव असुन यातुन बेकारी – बेरोजगारी आणि व्यसनाधिनतेचे प्रमाण मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे या समाजात शिक्षणा प्रती जागरूकता प्रचार प्रसार करणे गरजेचे आहे असे मत मोघे साहेबांनी मांडले. त्यामुळे समाजातील युवकांनी पुढे येऊन ही जबाबदारी स्विकारून समाजाला सुशिक्षीत आणि विकसित करण्याचे काम करावे. आजवर या समाजाने काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठता दाखवत पक्षासोबत राहण्याचे काम केलें. त्याबद्दल त्यांनी समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तर समाजाच्या उत्थानासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असेल असा विश्वास यावेळी समाजबांधवांना दिला.
यावेळी वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वामनराव कासावार साहेब, जिंतेंद्रभाऊ मोघे, के. मूर्ती (नगराध्यक्ष किनवट) आशिष खुळसंगे( माजी जि. प. सदस्य, यवतमाळ) रुपेश कल्यामवार, बिशनसिंग शिंदो, मनोज भोयर, विष्णूभाऊ राठोड, नारायणभाऊ सांगळे, या मेळाव्याचे आयोजक देवण्णा पालेकर, आनंदराव मोगरे, शंकर पालेवार, शंकर मंत्रीवार, सुभाष दर्शनवार, रामदास पवार, वामन खंदारे यांच्या सह हजारोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते…
