ज्या लेखन्यांनी इथल्या पत्करल्या लाचार्या
त्या लेखन्यांना म्हणावे बिचार्या बिचार्या
कुनी बाटोला धनुष्य अन पेटवल्या मशाली
कळ लावून हाती घेतल्या तुतार्या तुतार्या
मारती मौज मस्ती भोगती हे विलास
जनतेच्या वाट्या आल्या मुतार्या मुतार्या
वांज राहिली इथली गर्भार लोकशाही
तेल गेल्यावर हाती उरल्या धुपार्या धुपार्या
राजरोस फिरते डाका टाकून ह्या टोळ्या
इथल्या नेत्यास का म्हणू नये खुनार्या खुनार्या
ज्या लेखन्यांनी इथल्या पत्करल्या लाचार्या
त्या लेखन्यांना म्हणावे बिचार्या बिचार्या
विजय ढाले
#बिब्बा