संदिप ढाकुलकर शिक्रापूर
“रा. काँ.पा. शरद पवार गट कार्यालयाचे जनसंपर्क कार्यालयं उद्घाटन संपन्न,,
शिक्रापूर .ता. शिरुर जिल्हा पुणे येथे रा. कॉ.पा. शरद पवार गटाचे संपर्क आणि प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सौ सुजाता भाभी अशोकराव पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळेस बोलताना ‘ही निवडणूक महिलांच्या चुलीशी निगडित आहे, त्यासाठी संसदेत शेतकरी सर्वसामान्य मजूर महिलावर्ग यांच्याकरिता आवाज उठवणारा खासदार परत संसदेत पाठवायचा आहे असे या वेळेस सुजाता पवार यांनी मनोगत व्यक्त केले या उद्घाटन प्रसंगी शिरूर आंबेगाव विधानसभा शरद पवार गट अध्यक्ष शेखर दादा पाचुंदकर, आबा करंजे मा. सरपंच शिक्रापूर, विद्याताई भुजबळ महिला अध्यक्ष शिरूर तालुका, दत्तात्रय टेमगीरे माजी सरपंच बुरुंज वाडी, रमेश नाना थोरात, विशाल खरपुडे मा.उप सरपंच शिक्रापूर, सारिका सासवडे, वंदना भुजबळ ग्रामपंचायत सदस्या शिक्रापूर, चंद्रकला भुजबळ माजी सरपंच शिक्रापूर, अनिल राऊत चेअरमन सोसायटी, संदीप गायकवाड चेअरमन सोसायटी, मधुकर भुजबळ माजी चेअरमन सोसायटी, सौ . पूजा दीपक भुजबळ विद्यमान ग्रामपंचायत सदस्या हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी सोमनाथ भुजबळ यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळेस शेखर दादा पाचुंदकर यांनी जनसंपर्क कार्यालयास शुभेच्छा देत आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे हे नक्कीच संसदेत जाईल असा विश्वास व्यक्त केला. विश्वास काका ढमढेरे यांनी यावेळेस मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन सौ पूजाताई भुजबळ तर प्रास्ताविक सुनील भुमकर आणि आभार उद्योजक दीपक भुजबळ यांनी मानले.
