गेले अनेक दिवसांपासून आर्णीत राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा रंगत असतांना आज अचानक ही चर्चा तीव्र झाली आहे.
राज्यात एका रात्रीतून पक्ष बदलाची किंवा राजकीय भूकंपाची प्रथा नवीन नाही पण इन लोकसभा निवडणूक सुरू असताना अशा चर्चा पुढे येत असल्याने आर्णीत घडणाऱ्या या राजकीय घडामोडीचे पडसाद ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकाला नंतरच कळेल.
एका राष्ट्रीय पक्षाचा एक गट व नेता निवडणूक प्रचारा पासून लांब असल्याने तर्क वितर्क लावल्या जात होते.पण नाराज नेत्यांची समजूत काढल्या जाईल असे वाटतं असतांना व आज लोकसभा उमेदवार आर्णीत येत असताना काय होते ते पहाणे महत्वपूर्ण ठरणार आहे.
नाराज असलेला तो राजकीय नेता दिगग्ज असून आर्णी च्या राजकीय व सामाजिक क्षेत्रावर पकड असल्याने त्या राष्ट्रीय पक्षाच्या गोटात चिंता वाढली आहे.