चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असतांना दोन प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार आर्णी तालुक्यातील अनेक प्रमुख मोठया गावात प्रचारास येत असल्याने आजचा दिवस राजकीय रणधुमाळीचा असणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे महा युतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार व काँग्रेस उमेदवार महा विकास आघाडी प्रतिभा ताई धानोरकर यांचा आर्णी तालुक्यातील काही ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत
प्रतिभा ताई यांच्या जाहीर सभा सावळी व आर्णी या दोनच ठिकाणी होणार असून सुधीर भाऊ मुनगंटीवार याच्या मात्र
सावळी ,लोनबेहळ,बोरगाव, जवळा येथे जाहीर सभा होणारे आहे.आजच्या सभेला कोणत्या उमेदवाराला मतदार नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष लागले आहे.