आर्णी केळापूर विधानसभा शिवसेनेला सुटणार?
डॉ विष्णू उकंडे यांना संधी मिळण्याची शक्यता
आर्णी केळापूर विधानसभा हा अनुसूचित जमाती साठी राखीव असून यामध्ये आर्णी घाटंजी केळापूर तालुक्याचा समावेश होतो
आर्णी तालुक्यातील चार जिल्हा परिषद सर्कल तर घाटंजी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद सर्कल केळापूर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद सर्कल तथा इतर काही गावे व आर्णी घाटंजी पांढरकवडा शहराचा समावेश होतो.
मतदानाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक मतदान आर्णी तालुक्यात असून सर्वात कमी केळापूर तालुक्यात मतदान आहे.
सदर मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला असून शिवसेनेचे संपर्कप्रमुख हरिहर लिंगणवार तथा जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड यांनी नामदार संजय राठोड तथा शिवसेना सचिव संजय मोरे यांच्याकडे आर्णी केळापूर विधानसभा शिवसेनेकडे देण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात नामदार संजय राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आर्णी केळापूर विधानसभा शिवसेनेकडे देण्यासंदर्भात मागणी केल्याचे समजते.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघ शिवसेनेकडे ठेवून इतर मतदारसंघ बदलून देण्याची तयारी दर्शवली आहे. आर्णी केळापूर विधानसभेत महायुतीसाठी काट्याची लढत असून भाजपा मधील अंतर्गत कलह पाहता कोणत्याही उमेदवारावर एकमत होणे शक्य नाही.
त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत डॉ विष्णू उकंडे सर्वांना चालणारा एकमेव उमेदवार असून आर्णी केळापूर विधानसभेतील भाजपा पदाधिकारी तथा भाजपा नेते अण्णासाहेब पारवेकर.हंसराज अहिर तथा सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे कळते.
सदर सीट ही शिवसेनेला सुटल्यास भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची कसब डॉ विष्णू उकंडे यांच्यात असल्याने विजयी उमेदवार म्हणून डॉ विष्णू उकंडे यांच्या कडे बघितले जाऊ शकते. वेळ प्रसंगी डॉ विष्णू उकंडे यांच्या हातात कमळ पडल्यास नवल वाटणार नाही.