यवतमाळच्या दुरगोस्तवाची तयारी जोरदार सुरू असतांना यवतमाळ दारव्हा मार्गावर पट्टेदार वाघाचे दर्शन झाले.या परिसरातील ३ जनावरांचा त्या वाघाने फडशा पाडला असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.सध्या उघाडी चे वातावरण असल्याने शेतीतील कामाची लगबग सुरू आहे. मजूर महिला पुरुष व शेतकरी शेतात असतात.
एका चारचाकी वाहन धारकाने रुबाबात फिरणाऱ्या वाघोबाची व्हिडीओ शूटिंग केली हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. वाघोबा ऐटीत डरकाळी फोडतांचा व्हडिओ भय वढवणारा आहे.दुरगोस्तव सुरू झाल्यावर रात्री अपरात्री यवतमाळ शहरा नजीकच्या गावातील मंडळी दुर्गा क्सस्वी पहाण्यासाठी येतात त्यामुळे वनविभागाने या वाघोबाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
पहा डरकाळी फोडणारा पट्टेदार वाघ