यवतमाळ शहरात पाण्याच्या समस्येने जनतेचे हाल होत आहेत. राज्यभरात सर्वत्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, पाणीसाठ्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी आले परंतु यवतमाळच्या जनतेची पाण्यासाठी वणवण काही थांबलेली दिसत नाही.
निष्क्रिय सरकारच्या आणि लोकप्रतिनिधींच्या चुकीच्या धोरणामुळे सुरू असलेल्या पाणीटंचाई वर आवाज उठवण्यासाठी आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पाण्यासारखी मूलभूत सुविधा न देऊ शकणाऱ्या प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाण्याची सोय तात्काळ करून देण्यासाठी आग्रह केला. १३ दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे निदर्शनास आणून देताच पाणी उपलब्ध करून देण्याचा शब्द अधिकाऱ्यांनी दिला व त्या भागात पाणी सोडण्यात आले.
दिवसेंदिवस गहन होत असलेला हा प्रश्न लवकरात लवकर प्रश्न मार्गी न लावल्यास परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला.