आरोग्यसंपदा ही सर्वोच्च संपत्ती आहे..!
माझ्या यवतमाळ शहरातील जनतेचे आरोग्य संपन्न व निरोगी राहावे ही जबाबदारी समजून आज यवतमाळ शहरातील उर्दू हायस्कुल पोबारू लेआऊट व उर्दू ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् , नायरा पेट्रोल पंपाच्या मागे नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले होते. यवतमाळ शहरातील नामवंत डॉक्टरांनी या आरोग्य शिबिरात नागरिकांची मोफत तपासणी केली. उपस्थित नागरिकांना मोफत औषध वाटप करण्यात आले. संपूर्ण यवतमाळ हे माझे कुटुंब आहे आणि माझे कुटुंब ही माझी जबाबदारी समजून हे आरोग्य शिबीर घेण्यात आले. आगामी काळात यवतमाळ शहरात नागरिकांना सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आज ज्या पद्धतीने मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आरोग्य शिबीर संपन्न केले त्याच पद्धतीने यापुढेही यवतमाळच्या जनतेची आरोग्य सेवा अविरत सुरू ठेऊ हा विश्वास व्यक्त केला.
या परिसरातील नागरिकांसाठी आयोजित शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारी समजून घेत उपस्थित डॉक्टरांच्या टीमने योग्य निदान करत आरोग्यविषय सल्ला दिला.
या उपक्रमातून अनेकांना आपल्या आरोग्याशी निगडित समस्यांवर उपाय करण्यासाठी सल्ला व मोफत औषधे मिळाली ज्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य होते. माझ्या सर्व मित्र परिवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेत हा कार्यक्रम यशस्वी केला. उपस्थित जनतेच्या प्रतिक्रिया व त्यांच्या चेऱ्यावरचे समाधान पाहून या आरोग्य शिबीराचा माझा उद्देश सफल झाल्याच्या मनस्वी आनंद मिळाला.