बीड जिल्ह्यातील नारायणगड ला पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा घेण्यास मनाई केल्यावर पंकजाताई ने भगवानगडावर दसरा मेळावा घेतला पण आता मराठा समाजाला ओबीसी मधून सरसगट करणारे व लढा देणाऱ्या क्रांतिसूर्य मनोज जरांगे पाटील येथून कुठली घोषणा करतात हे पहाणे ।हत्वाचे आहे.
मनोज जरांगेच्या उपस्थितीत नारायण गडावरती पहिला दसरा मेळावा होणार आहे. मनोज जरांगे पाटील हे बीड येथील नारायण गडावरती दसरा मेळाव्याला संबोधित करणारेत. आज नारायणगडावरती मराठा बांधवांची बैठक पार पडली. यामध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलाय.. विधानसभा निवडणुकी अगोदर हा मेळावा महत्त्वाचा असणार आहे. या मेळाव्यात जरांगे पाटील काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे