कुंभार म्हणजे बारा बलुतेदार समूहातील एक जात पूर्वी मातीच्या चुली मातीचे पिण्यास थंड पाण्यासाठीमडके मोठे मोठे असायचे “फिरत्या चाका वरती देतो मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार’ या अभंगाच्या ओळी संत गोरोबा काका च्या भक्तीची प्रचिती देतात या समाजातील रामल्लू कुंभरानेही आपला जातिवंत व्यवसाय सुरू केला पण हल्ली फ्रीज चा जमाना व बिस्लरी पाणी पाऊच च्या युगात मडके माठा ची विक्री मंदावली अन कुंभाराच्या रोजगारावर गदा। आली.म्हणून रामल्लू यसनी मूर्ती घडवायचा व्यवसाय सुरू केल.मातीला आकार येऊ लागला अन सुबक मूर्ती आकार घेऊ लागल्या.रामल्लू राजूरकर हे मूळचे माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील.मात्र काही काळाने रामल्लू याचे चिरंजीव विजय हा देखील या व्यवसायात मदत करता करता मूर्ती कलेत पारंगत झाला व मग त्यांच्या मूर्तीला प्रचमद मागणी वाढू लागली.,म्हणून त्यानी लोनबेहळ गाठले महामार्गाला असलेले हे गाव येथील नारायण ले आऊट मध्ये त्याना निलेश आचमवर यांनी जागा उपलब्ध करून दिली. न व्यवसाय बहरला.,गणपती दुर्गा देवी महालक्ष्मी मुखवटे शारदा देवी,बैल विक्री होऊ लागले सर्व सहित्य खर्च वजा जाता ३५% नफा यात मिळतो विजय रामल्लू राजूरकर सांगतो पण या व्यवसायात नफा कमी असला तरी समाधान मिळते असे दोघेही बाप लेक अभिमानाने सांगतात.
आज राजूरकर याचा मूर्ती आर्णी तालुक्यातील गावात नव्हे तर अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर दारव्हा या ठिकाणी देखील जातात सुबकता अन चेहर्यावर जिवंत भाव ही या बाप लेकांची खासियत आहे
रामल्लू राजूरकर(मूर्तिकार वडील)




रांगोळी काढणारी दुर्गा माता

डोक्यावर टोपली घेऊन शेतात जाणारी शेतकरी दुर्गा माता

विजय रामल्लू राजूरकर मूर्तिकार मुलगा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका भजनात म्हणतात
‘एक तरी अंगी असू दे कला,नाही तर काय उगा जन्मला‘
हे राजूरकर पिता पुत्र आपल्या मूर्ती कलेतून सुप्रसिद्ध झाले आहेत.