यवतमाळच्या शहराला बेंबळा धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी ३६० कोटी रुपयांची योजना आहे ती सपशेल फोल ठरली नाव अमृत योजना असली तरी ही योजना भ्रष्टाचाराणे गढूळ व विचडी असतांना या योजनेचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचाघाट कशासाठी असा प्रश्न उपस्थित करून विधानपरिषद चे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संदीप बाजोरिया यांनी संताप व्यक्त करून सरकार वर तोफ डागली
निवडणुकीच्या तोंडावर ही जनतेची दिशाभूल असून न खाऊ गा और न खाणे दुगा म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदी साहेबांनी या योजनेतील गैरप्रकारां बाबत माहिती घ्यायला हवी होती असेही संदीप बाजोरिया पत्रकार परिषदेत ।हणाले.
302 कोटी रुपयांच्या यवतमाळ अमृत पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचारी महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्टाचारामुळे ही योजना पूर्ण पणे फेल झाली आहे. या योजनेचे काम पूर्ण झाले नाही. यवतमाळकरांना आजही 6-7 दिवसांतून एकदाच पाणी पुरवठा होतो आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्याने या योजनेतील निकृष्ट पाईप पुरवठादार कंपनीला व ठेकेदारांना लाभ व्हावा म्हणून अशुद्ध हेतूने प्रेरित होऊन यवतमाळ न.प.ला 60,00000/-रुपयांचा चुना लावला आहे. इतकेच नव्हे तर या सर्व कंपन्या ब्लॅकलिस्ट करण्याचे प्रस्ताव मजीप्राने शासनास सादर केले असतांना सुध्दा या गुन्हेगारांवर कारवाई न करता त्यांना पद व अधिकाराचा दुरुपयोग करून आर्थिक मदत करण्याचे काम केले आहेत. इतकेच नव्हे तर आडके कंपनीने 2019 मध्ये अडीच वर्षांत काम पूर्ण केले नाही म्हणून आडके कंपनीला दर दिवस 4,61,990/- रुपये इतका दंड लावला हा दंड 40 कोटी रुपयापेक्षाही जास्त होतो हा दंड आजपर्यंत वसूल करण्यात आला नाही. या योजनेतील भ्रष्टाचारात तीन टांग्या डंगऱ्या सरकारचाच हात आहे हे चौकशीत सिद्ध झाले असतांना सुध्दा भाजपाच्या भ्रष्टाचारी नेत्यांवर ईडीची कारवाई करुन त्यांना तुरुंगात घालण्याऐवजी काम पूर्ण न झालेल्या योजनेचे लोकार्पण करणे हे पूर्ण पणे हास्यास्पद आहे. प्रधान मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तिला हे न शोभणारे आहे. हलक्या प्रसिद्धीचा हा प्रकार आहे दुसरं काहिच नाही. विकासाच्या गोंडस नावाखाली महाराष्ट्रातील जनतेचा पैसा लुटण्याचे काम सुरु आहे.असा घणाघात बाजोरिया यांनी केला आहे.