जाती धर्माच्या कुप्रथा आजही समाजातून हद्दपार झाल्या नाहीत. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार चा समाजकल्याण विभाग योजना देखील राबवते पण तरीही आज देखील हॉनर किलिंग चे प्रकार घडत आहेत यावर एक मराठी चित्रपट सैराट देखील आला होता.
मुलीच्या बापाने पोटच्या मुलीवर गोळ्या झाडून तिला ठार केले तर जावयाला गंभीर जखमी केले.या मुळे भर लग्न मंडपात एकच खळबळ उडाली यावेळी त्या क्रूर कर्मा मारेकरी बापास लोकांनी चांगलाच चोप दिला यात तो जखमी झाला.
याबात सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील एका मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता.त्याचा राग मनात मुलीच्या वडिलांच्या मनात घुमसत होता. अर्जुन मंगले (४८) रा.शिरपूर असे आरोपी क्रूर आरोपी पित्याचे नाव आहे
तृप्ती नावाच्या तरुणीने अविनाश ईश्वर वाघ (२८) दोघेही रहाणार करवंद तालुका शिरपुर हल्ली मुक्काम कोथरूड पुणे यांचा प्रेमविवाह झाला होता. आरोपी मुलीच्या वडिलांना आरोपी किरण मंगले यास हा विवाह मान्य नव्हता.
मृतक अविनाश हा आपल्या बहिणीच्या लग्नासाठी चोपडा येथे पत्नी सोबत आल्याची माहिती आरोपीस मिळाली तेव्हा हळदीचा कार्यक्रम लग्न मंडपात सुरू असतानाच आरोपी गेला व त्याने पिस्तूलातून मुलीवर गोळ्या झाडल्या यात मुलीचा मृत्यू झाला तर जावाया वर केलेल्या हल्ल्यात जावाई अविनाश गंभीर जखमी झाला आहे त्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेही यांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे.