7k Network

गोव्यात देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी ६ भाविक ठार तर ५० जखमी

श्रद्धा असली की भाविक मोठया प्रमाणात दर्शनासाठी येतात हे आपण उत्तरप्रदेश मधील कुंभ मेळ्यात पाहिले.यासाठी भाविक जीवाची देखील पर्वा करत नाही.पण कधी कधी अचानक उडालेला गोंधळ आयोजक अथवा इतरांचा नियोजनात राहिलेली कमतरता या मुळे अपघाती घटना घडतात.

अशीच एक दुर्दैवी घटना पणजी गोवा राज्यात घडली देवीच्या दरवर्षी भरणाऱ्या यात्रेस सुमारे ५० हजारावर भाविक आलेले होते तेथे चेंगराचेंगरी होऊन ६ भाविक ठार झाले तर ५० भाविक जखमी होण्याची घटना घडली.

 

: गोव्यातील शिरगाव येथील देवी लईराई जत्रोत्सवादरम्यान चेंगराचेंगरी झाली. यात ७ जण ठार तर ५० हून अधिक जखमी झाले आहेत. ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या म्हापसा आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जत्रेच्या मुख्य विधीच्या दरम्यान ही घटना घडली.

यावेळी देवीच्या मंदिरामध्ये भव्य होमकुंड पेटवला जातो. या होमकुंडाकडे जाताना सुरुवातीला दोघेजण जमिनीवर पडले. त्यानंतर ही चेंगराचेंगरी सुरू झाली. यावेळी रस्त्याच्या कडेच्या दुकानांवर काही भाविक कोसळले. दुकानांना वीज पुरवठा होत असलेल्या वायर तुटल्यामुळे काहींना विजेचा शॉकही लागल्याची माहिती मिळत आहे. काही लोक कोयते आणि इतर अवजारे विकणाऱ्या दुकानांवर पडले. यात अनेकजण जखमी झाले. पहाटे ३ च्या दरम्यान ही घटना घडली. जत्रेला सुमारे २ लाख लोक उपस्थित होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. या चेंगराचेंगरीनंतर म्हापसातील जिल्हा रुग्णालयात ३० जणांना दाखल केले होते. त्यातील ५ भाविकांचा मृत्यू झाला. डिचोली रुग्णालयात २ भाविकांचा मृत्यू झाला. जखमींना म्हापसा, डिचोली आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात काही जणांवर उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. त्यानंतर म्हापसा येथील जिल्हा रूग्णालयाला भेट दिली. मंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही म्हापसा येथील इस्पितळाला भेट दिली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने नाकारलेली नाही. पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेली पूर्वतयारी पुरेशी होती का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या दुर्घटनेमुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात असून, सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी होत आहे.

पंतप्रधानांनी केले दुःख व्यक्त:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करून मुख्यमंत्री प्रमोद चौधरी यांच्याशी बातचित केली.व सर्वोतोपरी मदत करण्यासाठी आश्वासन दिले.

 

 

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!