विधानसभा निवडणुकी पूर्वी शेतकरी कर्जमाफी करण्याचे आश्वासन सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने दिले होते.मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पस्ट शब्दात कर्जमाफी फेटाळून लावली.
शेतकरी प्रश्नावर नेहमीच आक्रमक आंदोलन करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आता यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे.
९ नहू मे रोजी दुपारी २ वाजता आर्णी रोड वरील वनवासी मारुती मंदिराच्या जवळून मोर्चास सुरवात होणार आहे.प्रचंड उन्हात हा मोर्चा आहे पण तरीही शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील शिवसैनिक यांनी आपल्या हक्काच्या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन उबाठा शिवसेना जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांनी केले आहे.
सदर मोर्चात यवतमाळ वाशिम चे उबाठा शिवसेना खासदार संजय देशमुख हिंगोली चे उबाठा शिवसेना खासदार नागेश पाटील आष्टीकर वणी चे आमदार संजय दरेकर सहभागी होणार आहेत.
शिवसेना उबाठा चे आजी माजी पदाधिकारी युवासेना महिला आघाडी विद्यार्थी सेना यांचाही मोर्चात सहभाग असणार असल्याचे कळते.आक्रमक शिवसेनेच्या या मोर्चा कडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.