अशोक सदाशिवराव तम्मेंवार यांचे मरणोपरांत देहदानाचा संकल्प पुर्ण.
मरावे परी कीर्ती रूपे उरावे या म्हणी प्रमाणे रक्तदान नेत्रदान व देहदान या माध्यमातून मृत्यू नंतर कुणाला तरी आपले काही अवयव कामी यावेत असा संकल्प काही संवेदनशील माणसे करतात असेच एक सद्गृस्थ म्हणजे..
अशोक तम्मेंवार हे मुळचे कुर्ली येथील सदन शेतकरी,दानशुर व्यक्ति गरीबांचे कैवारी होते यांचे आज ३ में रोजी सकाळी ५.३० वाजता आर्णी नाका लक्ष्मी आपार्रमेंट यवतमाळ येथील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ८१व्या वर्षी निधनं झाले.
त्यांनी दहा वर्षापर्वि मुत्युपश्चात देहदान करण्याचा संकल्प एकता देहदान समीतीच्या जिल्हाअध्यक्षा समिना खालीक शेख यांच्या कडे रीतसीर फार्म भरुण व लेखी स्वरुपात लिहुन सुध्दा ठेवले होते.
त्याला बालाजी एग्रो एजेंसी चे संचालक राजेश ,व ऍड. उमेश तम्मेंवार, मुलगी सोनाली यांनी लेगेच होकार देऊन त्यांचा संकल्प पुर्ण करायचे ठरवले
आज ११.००वाजता त्यांच्या घरी शोक सभा घेऊन त्यांचा देह आयुर्वेद माहाविद्यालयाच्या
वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींना शिकता यावे या उदात्त हेतुने शरीर रचना शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.प्रज्ञा घोरमोडे डाॅक्टर हर्षदा उघाड़े यांना देह स्वाधीन करण्यात आले त्यावेळेस
मुलं राजेश, एंड उमेश तम्मेंवार,मुलगी सोनाली सुना जावाई नातवंड अप्तगन देहदान समीतीच्या अध्यक्षा समीना शेख सचिव,खालिक शेख आयुर्वेद रुग्णालयात उपस्थित होते.
विषेश बाब एकता देहदान समीती मागील २१ वर्षा पासुन हे कार्य करीत आहे आज पर्यंत चौदा देहदान व दोन नेत्रदान समीतीच्या मार्फत करण्यात आले आहे,
ही उल्लेखनीय बाब आहे
या वेळेस समीतीच्या अध्यक्षा समीना शेख यांनी जनतेला आव्हान करुण जास्तीत जास्त लोकांनी देहदान व नेत्रदान करावे अशी विनंती केली आहे