आर्णी दि.२/५/२०२५ ला तालुक्यातील उमरी( इ.) या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४) व्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी शाखा उमरी( इ.) च्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समता सैनिक दलाचे सहाय्यक कमांडर मोरे साहेब यांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माननीय दळवी साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले व दीप प्रज्वलन माननीय जिल्हा युवा अध्यक्ष दीपक गायधने व जिल्हा सचिव ज्ञानदीप चोपडे जिल्हा युवा उपाध्यक्ष आकाश वाकोडे तालुका अध्यक्ष उत्तम मुनेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष दळवी साहेब यांनी आपल्या भाषणातून एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी या सर्व १८ पगड जातीचा न्यायालयीन लढा व EVM लढा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब कसे लढत आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली
व वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष उत्तम मुनेश्वर यांनी वंचित बहुजन आघाडी मध्येच काम का केले पाहिजे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले वंचित बहुजन आघाडी तालुक्यातील पदाधिकारी मा. धनराज रामटेके लोणी मा. भारत गायकवाड पहूर मा. सयाजी गवळी पहुर मा.राजुरे पेंटर जवळा मा. पुंडलिक शेंडे लोणी मा. मनोज मुनेश्वर आसरा मा. सुभाष गायकवाड पहूर मा. शेषेराव गायकवाड पहूर उमरी ई. शाखेतील अधिकारी व पदाधिकारी संघर्ष ओंकार सुभाष पाटील निलेश वाकोडे संजय वाकोडे रवी उंबरे आकाश कांबळे विशाल बनसोड रोहन वाकोडे अभिजीत ओंकार प्रतीक ओंकार गगन उंबरे संदीप ठमके मयूर नरवाडे गौरव भगत विकास ओंकार आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सूत्रसंचालन सचिन पाटील व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजीव वाकोडे यांनी केले व कार्यक्रम संपन्न झाला