आयपीएल २०२५ ची प्ले ऑफ साठी ची खरी लढाई आता सुरू झाली असून सर्वच संघ अंतिम चार संघात जागा पक्की करण्यासाठी धडपडत आहेत.यामुळे प्रत्येक सामना रंजक होत असून
पंजाब च्या धर्मशाला स्टेडियम वर पंजाब विरुद्ध लखनौ चा सामना तुफान झाला पण यात लखनौ ला पराभुत करत पंजाब संघाने प्ले ऑफ ची आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे व पॉईंट टेबल मध्ये मुंबई संघाला माघे टाकत त्याचे ठिकाण बळकावले.
आयपीएलच्या १८व्या मोसमातील ५४ व्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सवर ३७ धावांनी विजय मिळवला आहे. पंजाबने लखनौसमोर धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये विजयासाठी २३७ धावांचं अवघड आव्हान ठेवलं होतं. मात्र लखनौला प्रत्युत्तरात २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १९९ धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबने अशाप्रकारे हा सामना जिंकला. पंजाबचा हा या मोसमातील एकूण सातवा तर लखनौ सुपर जायंट्स विरुद्धचा दुसरा विजय ठरला. पंजाबने याआधी १ एप्रिलला लखनौवर ८ विकेट्सने विजय मिळवला होता. पंजाबने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईला पछाडत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
पंजाब किंग्जने लखनऊ सुपर जायंट्सला ३७ धावांनी हरवले. पंजाबने प्रथम फलंदाजी करत २३६ धावा केल्या, तर लखनऊ १९९ धावांवरच थांबला.
पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (IPL 2025) या संघा दरम्यान खेळला गेला.
पंजाब किंग्जने ३७ धावांनी विजय मिळवला.
पंजाबची धावसंख्या: २३६ धावा ५गडी बाद
लखनऊची धावसंख्या: १९९ धावा.
सामन्यातील प्रमुख खेळाडू: प्रभसिमरन सिंगने ९१ धावा, आणि अर्शदीप सिंगने ३ विकेट घेत पंजाब कडून उत्कृष्ट खेळ केला.
आयुश बदोनी ची एकाकी झुंज..
अब्दुल समद याने २४ चेंडूत ४५ धावा केल्या. समद बाद होताच लखनौच्या विजयाची शक्यता आणखी कमी झाली. समदनंतर आयुष बदोनी हा देखील माघारी परतला. बदोनीने लखनौसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. बदोनीने ४० बॉलमध्ये ५ सिक्स आणि ५ फोरसह ७४ रन्स केल्या. तर प्रिन्स यादव १ रनवर नॉट आऊट राहिला. पंजाबसाठी अर्शदीप सिंह याने सर्वाधिक ३ विकेट्स मिळवल्या. अझमतुल्लाह ओमरझई याने दोघांना आऊट केलं. तर मार्को यान्सेन आणि युझवेंद्र चहल या दोघांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली.