सत्तेतून पैसा अन पुन्हा पैस्यातून सत्ता हे म्हणणे खरे आहे हे वारंवार सिद्ध झाले आहे.
तुम्ही आम्ही आमदार खासदार किंवा अगदी गावच्या सरपंचा पर्यंत लोकप्रतिनिधी निवडून देतो.त्याच्या हातून विकास व्हावा पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या अशी अपेक्षा असते गाव,शहर,तालुका,जिल्हा ,राज्य व देश हे लोकप्रतिनिधी चालवितात.
पण हल्लीचे राजकारणात निवडून येण्यासाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागतो मग निवडून गेलेला लोकप्रतिनिधी झालेला खर्च व पुढील निवडणुकीचा खर्च कमिशन कमावून काढतो.त्यामुळे प्रशासन मुजोर होते.
आमदारांच्या संपत्तीत वाढ कशी होते हे जगजाहीर आहे.पण झटपट श्रीमंत व्हावे पुन्हा सत्ता मिळेल की नाही याबाबत काहींना शंका असते.मग ते कुठल्याही मार्गाचा अवलंब करतात.
राजस्थान राज्यात राजकारण कलंकित करणारी एक घटना घडली. भारतीय आदिवासी पार्टी चे आमदार असलेले जयकृष्ण पटेल यांनी विधानसभेत मांडल्या जाणाऱ्या प्रश्नास हटवण्यासाठी तब्बल १० कोटी रुपयांची लाच माघीतली पण सेटलमेंट होऊन रक्कम ठरली ती अडीच कोटी त्या पैकी १ लाख आधीच घेतले व ठरल्याप्रमाणे जयपूरच्या आमदारांच्या घरी २० लाख रुपयांचा पहिला हप्ता घेण्याचे ठरले
या संदर्भात खान मालकाने लाच लुचपत विभागा कडे तक्रार केली होती. लाच लुचपत विभागाने सापळा रचून २० लाख रुपयांची बॅग घेताना अटक केली आहे.कोणत्याही आमदाराला लाच घेतांना रंगेहाथ पकडल्या ची कदाचित पहिलीच घटना असेल.राजस्थान मध्ये भाजप चे सरकार असून लाच घेणारा आमदार आदिवासी विकास पार्टी चा असून भविष्यात त्याने भाजप प्रवेश केला तर त्याला क्लिन चिट मिळू शकेल असा उपरोधिक टोला काँग्रेसने लगावला.