राजकारण हे असे क्षेत्र आहे की जेथे सर्व काही विसरण्याचा इतिहास आहे.कोण कोणाचा शत्रू अन कोण कधी कोणाचा मित्र होऊल हे सांगता येत नाही.
हल्ली राजकारणाची परिभाषा बदललेल्या स्थितीत असून विचार धारा तत्व हे सगळे बासनात गुंडाळले गेले आहे.
काल पर्यंत एकमेकांना पाण्यात पाहणारे आज गळ्यात गळा घालून फिरत आहेत.टोकाची व जहरी टीका कधी स्तुती सुमने होतील याचा नेम नाही.
असाच काहीसा प्रकार आता पुन्हा चर्चेत आला आहे. उर्फी जावेद ही आपल्या पेहरावा मुले सतत वादात असते.तिच्या तोकड्या कपड्यावर विधानपरिषदेत आमदार झालेल्या भाजप महिला नेत्या चित्रा वाघ चांगल्याच संतापलेल्या दिसत होत्या.
मुंबई च्या रस्त्यावर उर्फी चा नंगा नाच आम्ही सहन करणार नाही आज फक्त पोलिसांत तक्रार दिली पुढे जर आली तर उर्फी चे कानफाड फोडू असेही चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. उर्फी जावेद अन चित्रा वाघ यांच्यात बऱ्याच काळ शीत युद्ध सुरू होते.
पण अचानक आमदार चित्रा वाघ यांचे मत बदलले असून उर्फी आता सुधारते आहे ती पूर्ण कपड्यात दिसली त्यामुळे सतत तिला बोलणे बंद करून कधीतरी तिची स्तुती ही केली पाहिजे असे चित्रा म्हनाल्याने पुन्हा आमदार चित्रा ताई ट्रोल होत आहेत.त्यांचा उर्फी बाबत चा जुना व्हिडीओ लोक पाहून चित्रा वाघ यांच्यावर टीका करत आहेत.