आढावा बैठकीचे आयोजन
आर्णी वणी चंद्रपूर च्या खासदार प्रतिभाताई धानोरकर ह्या मतदार संघात चांगल्याच सक्रिय झाल्या असून त्यांनी आर्णी केळापूर हे लोकसभेचे शेवटचे टोक असले तरी येथील समस्यांना प्राथमिकता दिलेली दिसते.आधी आर्णी येथे व आता घाटंजी तालुक्यातील नागरिकांच्या वेगवेगळ्या विषयासंबंधित चंद्रपूर आर्णी लोकसभेच्या मा. खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकरविविध विभागाच्या समस्या बाबत आढावा बैठक घेत आहेत या सभेस राज्याचे माजी मंत्री श्री शिवाजीराव मोघे साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती असणार आहे.आज दि. ६ मे. २०२५ रोज मंगळवारला पंचायत समिती सभागृह घाटंजी येथे ठीक सकाळी १०.०० वाजता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे
सदर आढावा बैठकीला नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
घाटंजी तालुका काँग्रेस आणि शहर काँग्रेस कमिटी घाटंजी यांनी जनतेला आवाहन केले आहे.