जगातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी च्या संत साईबाबा हे देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जाते.
साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांकडून साईचरणी दान अर्पण केले जाते, त्यामध्ये सोने, चांदी, मौल्यवान दागिने आणि रोकडस्वरुपात दान दिले जाते. आता, शिर्डी साई संस्थानकडे असलेल्या सोन्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
देशात सर्वात अधिक दान पैसे सोने चांदी रुपात तिरूपती बालाजी संस्था तिरुमला, येथे गुप्त दान दिल्या जाते येथे मिळणारे दान देशात सर्वाधिक आहे.दुसऱ्या क्रमांकावर साईबाबा संस्था आहे.
जगभरात प्रसिद्ध असलेल्या शिर्डीतील साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशभरातून, जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. साईभक्तीत लीन होऊन ते पुन्हा नवी ऊर्जा घेऊन आपल्या कामावर जातात.
साईबाबा संस्थानकडे सोने ठेवायला भरपूर जागा असून साईबाबांचे सर्व सोनं मंदिर परिसरातील स्ट्राँग रूमध्ये ठेवण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण संस्थानकडून देण्यात आली
शिर्डी साईबाबा संस्थानकडे आज ५१४ किलो सोने असून त्यातील निम्मे सोनं रोजच्या वापरतील आहे. त्यामध्ये, साईबाबा सिंहासन, मंदिर गाभारा तसेच सोन्याचे मुकुट व सोन्याचे हार यांचा नित्य उपयोग होतो.
नित्यनियमाने वापरण्यात येणाऱ्या सोन्या व्यतिरीक्त उर्वरीत सगळे सोने संस्थानच्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित आहे.
दरम्यान, याप्रकरणी परवानगी मिळाल्यानंतर २०२३ मध्ये उच्च न्यायालयात यासंदर्भाने याचिका दाखल करण्यात आली आहे. अद्यापपर्यंत या याचिकेवर कोणताही निर्णय झालेला नसून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहितीही गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
साईबाबा ला मिळणाऱ्या देणगी मधून संस्थेच्या कर्मचारी यांचे वेतन वीज स्वछता भक्त निवास देखभाल व मोफत अन्न छत्र धर्मार्थ दवाखाना सामाजिक देणग्या उपक्रम आरोग्य शिबीर व सिंचन आपत्ती मध्ये मदत दिल्या जाते.