मुस्लिम समाजात शिक्षणा विषयी जागरूकता नाही,परिस्थिती हलाखी ची असते मिळणारे पडेल ते काम करून उदरनिर्वाह करणारे आपण आज बाजूला पहातो.
पण बदलत्या युगात शिक्षणाचे महत्व ओळखून आज एक वेळ उपाशी राहू पण मुला बाळांना शिक्षण देऊ ही भावना रुजत आहे आणि अनेक उदाहरण समाजाला प्रेरणादायी व आदर्श ठरतात नुकताच भारतीय प्रशासन सेवेतील परीक्षेचा निकाल लागला ही परीक्षा अत्यन्तकठीण असते व लाखो विध्यार्थी या परिक्षे साठी तयारी करतात.यवतमाळ च्या एका मुस्लिम रिक्षा चालकाच्या मुलीने कठोर परिश्रम करून आय ए एस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
आपला मुलगा डॉक्टर व्हावा इंजिनिअर व्हावा अशी आपली अपेक्षा ठेवून त्या अपेक्षेचे ओझे मुलांच्या खांद्यावर देतात त्यासाठी पालक मेहनत करतात पैसा खर्च करतात. मुलगा डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावा हे दडपण त्या मूलावर येते त्यातून काही वेळा अप्रिय घटना देखील घडतात.
नुकताच दहावी चा निकाल जाहीर झाला त्यात मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.
आर्णीत नव्या पिढी साठी नवाज सैय्यद हा एक आदर्श उदाहरण बनला असून तो एक प्रेरणादायी उदाहरण बनला आहे.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सय्यद परीवारान घेतली शिक्षण क्षेत्रात आघाडी
जुनी वस्तीतील सय्यद परिवारात अब्दुल्ला मास्तर म्हणुन तालुक्यातील नावाजलेले नावं
अब्दुल्ला मास्तर यांना चार मुले व तीन मुली होत्या
चारही मुले यांनी वडील शिक्षक असून देखील सुध्धा शेतकरी म्हणून जीवन जगले
चार मुलांना २१ मुली व १० मुले होती परिस्थीतीहलाखीची असल्या कारणाने ३१ लेकरात ३० मुले दहावीच्या आतच आपले शिक्षण पूर्ण करून परिवारात रमले
शेवटी उरलेल्या नवाज वहाब सय्यद याने इतिहास घडवत शिक्षण क्षेत्रात आघाडी घेवून कंपनी सेक्रटरी (CS) ची पदवी पुणे येथे घेवून प्राप्त केली नवाज इतक्यावरच थांबला नसून त्याने त्याच्या समोरील पिढीतील मुले पुणे येथे शिक्षनासाठी घेवून गेला एक बहिनीची मुलगी नेहा मुजीब बेग यवमाळमधील हि पुणे येथून वकिलाची पदवी प्राप्त करून समोरील शिक्षणं घेत आहे
दुसऱ्या बहिणींचा मुलगा सोहेल शब्बीर खान पुसद हे चार्टर्ड अकाउंट फायनल मध्ये आहे
नवाज यांचा मोठा भाऊ रियाज सय्यद याची मुलगी रिदा रियाज सय्यद हि सुध्धा नवाज यांच्या जवळ सातव्या वर्गापासून राहत आहे ती सध्या दहाव्या वर्गात आहे
नातेवाईकांचा मुलांना सुद्धा नवाज याच्या शिक्षणाचा फायदा होत आहे एक मुलाने जरी परिवारात शिक्षणं घेतल तर पुर्ण पिढीला शिक्षित करते हे नवाज याच्या शिक्षणाने दाखवून दिले
शहरात गेला की माणूस नातेवाईकास विसरतो पण नवाज व त्याच्या पत्नीने कुटुंबातील सर्वाना एकत्र ठेवले.
नवाज ची पत्नी सुद्धा कंपनी सेक्रेटरी आहे पुणे येथे स्वतःच घर आणि ऑफीस सुद्धा घेतले आहे