7k Network

भारताच्या मित्र राष्ट्रा मुळे शत्रू राष्ट्र होणार आर्थिक मजबूत

जेव्हा काश्मीर खोऱ्यात पसकीस्तांनी आतांकवाद्यानी पहलगाम येथे २६ निरपराध भारतीय पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या मारून ठार केले त्या नंतर संपुर्ण देशात संतापाची लाट उसळली हा नरसंहार घडला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर होते त्यांनी आपला दौरा अर्धवट ठेऊन भारतात परतले.

त्यानंतर उच्च स्तरिय सुरक्षा बैठका पार पडल्या आणि १४ दिवसाने भारताने पाकिस्तान च्या दहशतवादी ठिकाणावर हवाई हल्ला केला.युद्ध जन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहून अमेरिके ने मध्यस्थी करत संघर्ष थांबवला

या दरम्यान जागतिक बँकेचे व्यवस्थापकिय संचालक भारतात येऊन गेले त्यांना भारताने सांगितले की पाकिस्तान ला कर्ज देऊ नका पाक ती रक्कम दहशतवादी कारवाया साठी वापरतो पण जागतीक बँकेने  भारताचे न ऐकता,८००० कोटी चे कर्ज दिले.

 

पाकिस्तानत असलेल्या  बलुचिस्तानमध्ये असलेली रेको डिक खाण ही जगातील सर्वात मोठ्या अविकसित खाणींपैकी एक आहे. या खाणीतून 50  वर्षे दरवर्षी 2 लाख टन तांबे आणि 2.5 लाख औंस सोने काढता येईल. पाकिस्तानातील या सोन्याच्या खाणीत सौदी अरेबिया गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. सौदी अरेबिया या देशाचे भारतासह मैत्रीपूर्ण संबध आहेत. मात्र, तरीही सौदी अरेबिया ने पाकिस्तानला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

रेको डिक खाणीत सौदी गुंतवणुकीबाबत सकारात्मक चर्चा झाली.  सौदीची मनारा मिनरल कंपनी पुढील 6 महिन्यांत हिस्सा खरेदी करू शकते. लवकरच मोठी घोषणा होऊ शकते असं पाकिस्तानी मंत्री मुसादिक मलिक म्हणाले. सौदीचा हा निर्णय भारतासाठी मोठा धक्का ठरू शकते.

 

गेल्या वर्षी सौदी अरेबियाने या खाणीतील १५ टक्के हिस्सा खरेदी करण्याची ऑफर दिली होती. आता मूल्यांकन चौकट तयार झाली आहे, त्यामुळे करार अंतिम होण्याची अपेक्षा आहे. हा करार पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी गेम-चेंजर ठरू शकतो.
तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सौदी अरेबिया खाण क्षेत्रात गुंतवणूक वाढवत आहे. रेको डिकची अफाट संपत्ती त्याच्या रणनीतीचा एक भाग आहे. गेल्या वर्षी मनारा मिनरल्सनेही या प्रकल्पाला भेट दिली होती.

 

पाकिस्तानचे कर्ज त्याच्या जीडीपीच्या 42 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. रेको डिकमधील आपला हिस्सा विकून पाकिस्तान मोठा नफा कमवू शकतो. देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यात ही खाण महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या खाणीत पाकिस्तान सरकारचा 50 टक्के हिस्सा आहे, तर उर्वरित हिस्सा कॅनडाच्या बॅरिक गोल्ड कॉर्पकडे आहे. सौदी अरेबिया पाकिस्तानचा 15 टक्के हिस्सा खरेदी करण्याची तयारी करत आहे. या करारामुळे खाणीच्या विकासाला गती मिळू शकते.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!