बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते प्रहारचा संताजी धनाजी पुरस्कार विनोद तेलंगे यांना प्राप्त
उदगीर:- सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रहार चे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या वतीने प्रहार चे विभागीय मेळावा व संताजी धनाजी पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र मध्ये बच्चुभाऊ कडू हे एकमेव असे नेतृत्व आहे की जे कार्यकर्त्यांना आपला पक्ष मानून काम करत असतात.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रहार चे सक्रिय कार्यकर्ते असतात जे रक्तदान असो किंवा शेतकऱ्यांच्या लढा असो दिव्यांग बांधवांचा लढा असो बच्चू भाऊंनी हाक दिल्यानंतर लगेच सेवेत तत्पर असतात. अशा कार्यकर्त्यांचा बच्चुभाऊ कडू यांच्याकडून विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रहारच्या कार्यकर्त्यांचा संताजी धनाजी पुरस्कार प्रदान करून त्यांना गौरविण्यात येत आहे.
प्रहारचा सोलापूर विभागीय मेळावा सोमवार रोजी सोलापूर येथे पार पडला. यामध्ये सोलापूर, लातूर, धाराशिव येथील प्रहार कार्यकर्त्यांना संताजी धनाजी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
यामध्ये उदगीर येथील प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष विनोद भाऊ तेलंगे गेली आठ वर्ष प्रहार मध्ये सक्रिय कार्य करत आहेत. वेळोवेळी प्रहार तर्फे रक्तदान शिबिर असो किंवा वृक्षारोपण असो आंदोलन असो नेहमी सक्रिय असतात. त्यांनी वेळोवेळी दिव्यांगांच्या हक्कासाठी आंदोलने करून त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले त्याचबरोबर रुग्णांना गरज भासल्यास मदत मिळून देण्यासाठी वेळीच त्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना जी गरज भासते ती करतात.
मला आज जे काही पुरस्कार प्राप्त झाला आहे ते माझ्या दिव्यांग बांधवांमुळे त्याचबरोबर मी केलेल्या रुग्ण सेवेमुळे त्यामुळे मी माझा पुरस्कार यांना अर्पण करतो.
मला प्रहार मध्ये मोलाचे मार्गदर्शन लाभलेले माझे मार्गदर्शक बच्चू भाऊ कडू, त्याच बरोबर प्रमोद भाऊ कुदळे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांचे पण मनापासून आभार ..!
विनोद तेलंगे,
जिल्हा उपाध्यक्ष:- प्रहार जनशक्ती पक्ष लातूर