पाकिस्तान ने भारतातील कश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ला करून २६ पर्यटकांना ठार केले होते. भारतानेही पाकिस्तान ला सडेतोड उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवून नहू दहशतवादी ठिकाणे उद्धस्त करून शेकडो दहशतवादी ठार केले पाकिस्तान चे हल्ले परतवून निकामी केले यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य दलास खुली सूट दिली होती. भारतीय वीर जवानांनी केलेल्या पराक्रमा चे कौतुक करून आभार मानण्यासाठी देशात तिरंगा रॅली काढण्यात आली त्या नुसार आर्णीत देखील तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
यवतमाळ रोड वरील पाण्याच्या टाकी जवळून निघालेल्या विराट तिरंगा रॅली ने आर्णीत दर्षभक्ती चे अभूतपूर्व प्रदर्शन पहायला मिळाले.
सहभागी नागरिकांच्या हातातील तिरंगा ध्वज लक्षवेधी दिसत होते या रॅलीत आर्णी सायकलिंग क्लब चे सदस्य, माजी सैनिक देखील सहभागी झाले होते.
या तिरंगा रॅली मध्ये माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार. भाजप चे राजू पडगिलवार, प्रिया ताई तोडसाम,साजिद बेग,विलास पाटील,अनंता पाटील गावंडे, भाजप चे माजी जिल्हापरिषद सदस्य प्रकाश राठोड माजी जिल्हापरिष उपद्यक्ष मुबारक तंवर,एन टी जाधव,माधव राठोड,बिपिन राठोड, विशाल देशमुख भाजप तालुकाध्यक्ष किशन राठोड, आर्णी नगर परिषद चे माजी सभापती जावेद सोलंकी, युनूस शेख ,रिजवाण बेग,अनिस टेलर,सुरेश चिल्लरवार,विश्व हिंदू परिषद चे राजेश माहेश्वरी विनोद उर्फ विजय राठोड इतर मागासवर्गीय आयोगाचे अद्यक्ष व माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर याचे स्विय सहाय्यक अनिल इंगोले,सुरेश चिल्लरवार हेटी नवनगर चे सरपंच रवी राठोड आदी सह या तिरंगा रॅली चे नियोजन पूर्वक आयोजनात भारतीय जनता पक्षाचे आर्णी शहराध्यक्ष निखिल ब्राम्हणकर आमदार प्रा.राजू तोडसाम यांचे स्विय सहाय्यक मंगेश वानखडे,गोपाल शर्मा व भाजप चे पदाधिकारी कार्यकर्ते आर्णीकर नागरिक व्यापारी पत्रकार मोठ्या संख्येने हजर होते.