7k Network

आधी केल्या नकला आता आल्या गुणगाणं गायच्या अकला…!

भारतीय लोकशाहीत देशात सर्वात पुरोगामी व प्रगल्भराज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची ओळख होती ती यशवंतराव चव्हाण ते विलासराव देशमुख यांच्या कार्य काळा पर्यंत ठीक होती असे म्हणायला काही हरकत नाही.

पण गेल्या दहा वर्षात राजकारणात नीतिमत्ता ऱ्हास पावत जात आहे तर शब्दाला कवडीचीही किंमत आता उरलेली दिसत नाही.सत्तेसाठी वाटेल ती तडजीड करण्याचा पायंडा कु प्रथा निर्माण झाली आहे.

शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करतील असे कुणाला स्वप्नात देखील वाटले नाही.पण तसे झाले शिवसेना पक्ष एव्हढ्या मोठ्या प्रमाणात फुटेल राष्ट्रवादी काँग्रेस फुटेल व पक्षाचे नाव व चिन्ह  शिवसेना व राष्ट्रवादी कडून जाईल असे कोणाला वाटले असेल…?पण ते झाले कारण राजकारणाचे अधःपतन झाले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथून जाहीर सभेत महाराष्ट्रात घडलेल्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख भाषणात केला अन दुसऱ्या दिवशी ज्याच्या वर आरोप होते ते अजित पवार सुनील तटकरे धावत पक्ष फोडून  सत्तेत आले.केवळ तपास यंत्रणा व तुरुंगाचीभीती यामुळे अनेकांनी भाजप ची वाट धरली..

मुख्यमंत्री असताना सैनिका साठी बांधलेल्या आदर्श सोसायटीत मेहण्याला फ्लॅट दिला म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजप ने घेरत जवानांच्या टाळू वरचे लोणी खाल्ले म्हणून भाजप सेनेने जोरदार टीका केली होती. पण मग तेच अशोकराव चव्हाण काँग्रेस मध्ये अन्याय झाला म्हणून भाजप मध्ये गेले अन ४८ तासात भाजप चे राज्यसभा खासदार झाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर नांदेड मध्ये जाऊन अशोकराव “लीडर नसून डीलर आहेत”

अशी जहरी टीका केली होती आता मात्र त्याच अशोकराव चव्हाण यांना आदरणीय जेष्ठ नेते म्हणावे लागते…

असे राज्यात शेकडोंच्या वर उदाहरण आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर भर सभेत स्टेज वर ‘भाजप सोबत काम करता येत नाही माझा राजीनामा द्यावा” असे उद्धव ठाकरे यांना म्हटले होते.

उद्धव ठाकरे यांनीही काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध टोकाची टीका केलेली होती… राज ठाकरे देखील कधी भाजप वर टीका करतात तर कधी त्यांचे कौतुकही करतात.आता दोन ठाकरे टाळी देणार अशा चर्चा आहे.

एक म्हण आहे राजकारणात कोणी कोनाचा कायमस्वरूपी शत्रू अथवा मित्र असत नाही हे जरी खरे असले तरी नैतिकता नीतिमत्ता फक्त कार्यकर्त्या पुरती शिल्लक राहिली आहे.

शेजारच्या बिहार मध्ये दहा वेळा भूमिका बदलून मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमार यादव ला तर पलटूराम म्हणतात तरी त्यांना खुर्ची पुढे काहीच वाटत नाही.भारतीय मीडिया नेत्यांना सत्य सांगत नाही खोचक प्रश्न विचारत नाही त्याचा परिणाम राजकीय स्थिती रसातळाला जात आहे.

एव्हढा उहापोह यासाठी की काल राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिले.महाराष्ट्र सदन घोटाळा जो झालाच नाही त्यासाठी भुजबळ  सारख्य बहुजन नेत्यास तुरुंगात डांबले होते.काल परवा खा.संजय राऊत यांनाही जेल ची हवा खावी लागली.अनिल देशमुख देखील जेलात होते.

नाशिक च्या एका सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते “बरे झाले तुम्ही लोकसभेला भुजबळ यांना निवडून दिले नाही नाही तर जेल मध्ये निवेदन घेऊन जावे लागले असते”. पण आता केस चालणार आगे आगे देखो होता है क्या असे म्हणत जोरदार टीका केली होती…

भुजबळ पांढरी दाढीघेऊन नव्या लूक मध्ये जेल च्या बाहेर आले अन त्यांनी आक्रमकपणे भाजप वर टिका केली

महाराष्ट्र सदन बहुत सुंदर लेकीन बनाने वाला अंडर म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नकला केल्या देवेंद्र फडवणीस तर भुजबळ यांना नटसम्राट म्हणाले होते.

आता हेच भुजबळ ओबीसी चे किती महान नेते आहेत हे सांगताना भाजप वाले थकत नाहीत संपूर्ण आयुष्य मनुवादा ला विरोध करत शिव शाहू फुले आंबेडकर यांचे नाव घेता घेता सत्तेसाठी त्यांची तळी उचलण्याचे दुर्दैव उतार वयात भुजबळ साहेबांवे वर पुरोगामी राष्ट्रवादी काँग्रेस वर आली आहे.जेव्हढी स्तुती भाजप वाले केंद्रीय नेतृत्वाची करत नाही तेव्हढी स्तुती आता भाजप सोबत सत्तेची चव चाखणारे स्तुतीपाठक झाले आहेत.

प्रमोद कुदळे

बोल महाराष्ट्र

 

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!