२०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सत्तेत आले त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी देशाचे अनेक दौरे केले.
अमेरिकी देशातील अनिवासी भारतीयांचा हाव डी मोदी हा कार्यक्रम झाला.ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात जबरदस्त मैत्री चे नाते झाले अशी चर्चा होती मग
गुजरात ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरेंद्र मोदी स्टेडियम वर लाखो लोकांच्या उपस्थितीत मेरे दोस्त डोलांड ट्रम्प म्हणत आपली कशी मैत्री घट्ट आहे हे दाखवले होते एव्हढेच नाही तर अबकी बार ट्रम्प सरकार अशा घोषणा देऊन डोनाल्ड याचे मन जिंकण्यासाठी प्रयत्न केला.महा सत्ता होण्यासाठी अमेरिकी सारखा देश सोबत असावा म्हणून हा खटाटोप होता.
मात्र तेव्हा ट्रम्प यांचा पराभव झाला होता व बराक ओबामा निवडणून आले होते त्यानाही भारटा सोबत चार हात लांबून अंतर ठेवले होते मात्र पुन्हा ट्रम्प निवडून आले वाटले आता पुन्हा दोन्ही देशात समंध सुधारतील पण झाले उलटेच दोस्त दोस्त ना रहा म्हणण्याची वेळ आली डोनाल्ड ट्रम्प याने भारतातून उद्योगपती अंबानी नवरा बायकोला शपथविधी साठी बोलावले मात्र आपल्या देशाच्या पंतप्रधानाश निमंत्रण दिले नाही.
बर हा ज्याचा त्याचा वयक्तिक भाग आहे पण भारतीय नसग्रीक जे अमेरिकी देशात बेकायदा रहात होते त्यांना अट्टल आरोपी सारखे हाता पायात बेड्या घालून भारतात पाठवले इतर देशांच्या नागरिकांना मात्र तशी हीन वसगणूक मिळाली नाही.हे अचानक एव्हढे फाटन्याचे उत्तर अजून मिळाले नाही.मग अमरेरिकेने टेरिफ वाढवला नंतर कमी केला,।
आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प वारंवार युटर्न घेताना दिसत आहेत, भारत आणि पाकिस्तानमध्ये आपण मध्यस्थी केल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी युटर्न घेतला. मी मध्यस्थी नाही तर मदत केल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी आपली भूमिका बदलल्याचं पाहायला मिळत आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचं तोंडभरून कौतुक केलं आहे. पाकिस्तानचे लोक बुद्धिमान आहेत, ते खूप चांगल्या वस्तू तयार करतात असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानच्या निर्यातीवर 29 टक्के टॅक्स लागण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी पाकिस्ताननचं कौतुक केलं आहे.