शेतकरी व दिव्यांगाचे प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी राज्य मंत्री बच्चू भाऊ कडू चांगलेच आक्रमक झाले असून सुरवातीला अजित पवार यांच्या बारामती पासून ते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर च्या घरा पर्यंत रॅली काढण्यात येणार होती.
पण हवामान खात्याने यावर्षी मुसळधार पाऊसाची श्यक्यता वर्तवली असल्याने आता आंदोलनात बदल करण्यात आला असून शेतकऱ्यांना कर्जमाफी व दिव्यांगाना ६००० महिना मानधन देण्यात यावे या मुद्द्यासाठी आता अमरावती येथील गाडगेबाबा मंदिरा पासून (गाडगे नगर) येथून दिनांक २ जून २०२५ रोजी फोर व्हीलर रॅली काढण्यात येणार असून ही रॅली अमरावती नागपूर महा मार्गाने तिवसा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महा समाधी जवळ रॅली ची सांगता होऊन त्या ठिकाणी बेमुदत अन्न त्याग आंदोलनास सुरवात होईल.
रायगडाच्या पायथ्याशी राजमाता जिजाऊ मा साहेब यांच्या साक्षीने केलेले आंदोलन यशस्वी झाले होते तेव्हा १९ मागण्या पूर्ण झाल्या होत्या मात्र शेतकरी कर्जमाफी व दिव्यांग बांधवांना ६००० मानधन हे मुद्दे सरकार ने अजूनही मान्य केले पुन्हा सरकार वर प्रहार करण्यासाठी। माजी मंत्री बच्चू कडू सज्ज झाले आहेत.या आंदोलनात राज्यातील सर्व प्रहार चे पदाधिकारी कार्यकर्ते प्रहार जनशक्ती पक्ष,प्रहार शेतकरी संघटना,प्रहार दिव्यांग क्रांती च्या सर्वांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.