7k Network

फरदिन लाला या तरुणाने फरदिन लाला या जिगरबाज तरुनाणे जीवाची बाजी लावून विझवली आग

एखादी मदत करतांना जर त्यात जीवाची बाजी लागत असेल,स्वतःचा जीव धोक्यात जात असेल तर अशा मदतीला कोणी धावत नाही “नो रिस्क नो हेल्प’ म्हणून लोक टाळतात.

पण काही बाजीगर जिगरबाज जीवाचि बाजी लावतात त्या घटनेत आपल्या सोबत काहीही घडो त्याची चिंता त्यांना नसते.

आर्णीतील एका धाडसी तरुणाचे नाव आहे फरदिन लाला हा तरुण सामाजिक कार्यकर्त्या प्रिया ताई तोडसाम यांचे स्विय सहायक आहेत.

यवतमाळ रोड वरील तहसील कार्यालया च्या आवारात  उभ्या असलेल्या रेती तस्करी प्रकरणात चार वर्षा पासून जप्त असलेल्या टिप्पर ला अचानक आग लागली धुराच्या लोटा बाहेर दिसताच रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी तिकडे धाव घेतली.

बघ्यांची गर्दी शुटिंग फोटो घेण्यात व्यस्त असतांना फरदीन लाला या तरुणाने जीवाची पर्वा न करता टिप्पर वर चढून आग विझवली..

तहसील कार्यालयात तेव्हा रविवार ची सुट्टीव्होती म्हणून केवळ एक शिपाई होता त्याने छोट्या अग्निशमन बंबाने आग विझवण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही मग आर्णी नगरपरिषद च्या अग्नी शमन विभागाने आग विझवली पण या टिप्पर च्या पाच फूट अंतरावर महसूल ची स्ट्रॉंग रुम होती जर आग तिकडे गेली पसरली असती तर अनेक कागदी दस्तावेज जळून खाक झाली असती.फरदिन लाला च्या धाडसाने मोठा अनर्थ टळला…

टेम्पोला लागलेल्या आगीवर धाव घेतली…

आर्णीच्या ‘फरदिन’चं तहसील कार्यालयात गौरवाने सन्मान

आर्णी  प्रतिनिधी

शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या टेम्पोला अचानक लागलेल्या आगीत एकच खळबळ उडाली. घटनेच्या क्षणात उभ्या असलेल्या लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण होतं. परंतु, या गोंधळातही एका युवकाने प्रसंगावधान राखून धाडस केलं आणि संभाव्य मोठ्या अनर्थाला रोखलं.

रविवार (दि. १८) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एम.एच. २९ सी.यू. ४२७१ क्रमांकाच्या जुन्या टेम्पोला अचानक आग लागली. ही गाडी मागील काही वर्षांपासून कार्यालयात शासकीय कार्यवाहित असल्याने उभी होती. आगीचं नेमकं कारण स्पष्ट नसतानाही, ज्वाळा वेगाने उठू लागल्या. आग भडकण्याआधी काही प्रमाणात नुकसान झालं; मात्र उपस्थित कर्मचाऱ्यांनी आणि युवकांनी तत्काळ प्रयत्न करत ती आग आटोक्यात आणली.
याच प्रसंगी, आर्णी शहरातील युवक फरदिन लाला याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आग विझवण्याचे धाडस दाखवले. या कार्याचे कौतुक करत सोमवारी त्याचा तहसील कार्यालयात जाहीर सत्कार करण्यात आला. तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, ठाणेदार सुनील नाईक ,आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रिया शिंदे यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला. या वेळीराजू पटगीलवार,रोहित राठोड, राजेश श्रीवास,विपीन राठोड, सद्दाम शेख अनिल इंगोले, किसन राठोड,आरिफ शेख, सविताताई जाधव, पूजा ताई ढाले,शारुख फानन,अंकुश राजूरकर, भाविक मनापुरे, असरार सय्यद आदी उपस्थित होते.

दरम्यान, तहसील कार्यालयात लागलेल्या आगीची अधिकृत चौकशी सुरू करण्यात आली असून सुरक्षेच्या उपाययोजनांवरही प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे असे सांगण्यात आले

Oplus_131072

 

प्रिया शिंदे म्हणाल्या, “आजच्या काळात अनेकजण मोबाईलमध्ये व्हिडीओ टिपतात, पण फरदिनने प्रसंगाचे गांभीर्य ओळखत, न थांबता आग विझवण्याचा प्रयत्न केला. अशा युवकांचा गौरव होणं गरजेचं आहे.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!