“घार फिरते आकाशी नजर तिची पिल्यापाशी” या उक्ती प्रमाणे दिग्रस दारव्हा नेर चे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय भाऊ राठोड यांचे काम आहे म्हणून तर त्यांनी मतदारसंघात विजयाचा पंचम फडकवला…
मंत्री म्हणून सर्व राज्यात काम करण्याचे आवाहन सोबत पालकमंत्री म्हणून जिल्ह्याची जवाबदारी खांद्यावर असतांना देखील वेळात वेळ काढून मतदारसंघ आणि त्यातील विकास कामे,समस्यां संजय भाऊ राठोड सोडविण्यासाठी धडपड करत असतात सोबतच सुखद प्रसंगी उपस्थिती,दुःखाच्या प्रसंगी सांत्वन देण्यास संजू भाऊ जातात.आजही यवतमाळ येथे जिल्हास्तरीय बैठक आटोपून ते दिग्रस विधानसभा मतदारसंघात येऊन आढावा बैठक घेतली.