एका अशिक्षित महाराष्ट्राच्या बाईने संकरित धान्या मुळे उद्भवणारे विविध आजार व दिवसेंदिवस रासायनिक खते बी बियाणे यामुळे शरीर व मनावर होणाऱ्या परिणामांची चिंता वाटून राही बाई यांनी देशी वाण बिया जतन करून क्रांती केली आणि ती बिजमाता म्हणून प्रसिद्ध झाली या असामान्य बिज मातेची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले. या बिज माते च्या भेटीला शेतकऱ्यांनाचे दिव्यांगाचे नेते भूमी पुत्र माजी राज्य मंत्री बच्चू भाऊ कडू गेले. यावेळी राही बाई यांनी शेती विषयावर चर्चा केली व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली.सोबत बच्चू भाऊ शेतकरी व दिव्यांगाचे प्रश्नाचे वर करत असलेल्या संघर्षास आशीर्वाद दिला.विशेष म्हणजे अकोल्याचे पालकमंत्री असतांना बच्चू भाऊ कडू यांनी धान्य महोत्सव घेत शेतकऱ्यांना प्रक्रिया केलेले बियाणे उपलब्ध करून दिले होते.
बचत गटाच्या माध्यमातून काम राहीबाई यांच्याकडे अनेक जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. त्यांनी त्यांच्या सीड बँक मध्ये संवर्धन केलेले बियाणे इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनी कडे उपलब्ध नाहीत. राहीबाईंनी ज्या गावठी बियाण्याचे संवर्धन केले आहे ते मूळ स्वरूपात आहे व त्याला आपले पूर्वज शेकडो वर्ष खात होते. राहीबाई यांनी तीन हजार स्त्रिया व शेतकरी सोबत घेऊन बचत गट बनवला आहे. या बचत गटांच्या माध्यमातून या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. पारंपरिक पद्धतीनं जतन केल्या बिया पद्मश्री राहीबाई यांची सीड बँक जेव्हा आपण पाहायला जातो तेव्हा त्या उत्साहाने सगळ्या बियाण्यांबद्दल आपुलकीने माहिती देतात. आपण ज्या भाज्या बद्दल कधीही ऐकलं नाही. त्या भाज्यांचं वाण त्यांनी पारंपारिक पद्धतीने जतन करून ठेवले आहे. त्यांच्या मते आपण जे खातो त्याने आपले शरीर बनते. शरीर सुदृढ असेल तर मनही सुदृढ राहील असा त्यांचा आत्मविश्वास आहे. कुणी केस कापतंय तर कुणी चपला शिवतंय; वारकऱ्यांच्या सेवेत भेटतोय विठ्ठल सीड बँकेत 250 हून अधिक वाण राहीबाईंच्या सीड बँक मध्ये आज अनेक पिकांचे 250 पेक्षा अधिक वाण आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी त्यांचा सीड मदर म्हणजेच बीजमाता असा उल्लेख केला होता. पुढे त्यांना याच नावाने ओळखले जाऊ लागले. बीबीसीने शंभर प्रभावशाली महिलांमध्ये राहीबाई यांचा समावेश केलेला आहे. पारंपरिक पिकांचे शेकडो देशी वाण जतन करण्यासाठी राहीबाई यांनी मोठे योगदान दिले आहे. शाश्वत शेतीला वरदान बीएआयएफ संस्थेच्या मदतीने त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावात सीडबँक सुरू केली. त्यामुळे शाश्वत शेतीला मोठं वरदान मिळतंय. याचा परिणाम म्हणून अहमदनगरच्या अकोले तालुक्यासह चार तालुक्यात ५० टक्के शेतकरी गावरान बियाणे वापरतात. यामुळे रासायनिक शेती कमी होऊन नैसर्गिक व गावरान पीक घेतलं जातंय . ज्यामुळे आजार कमी होण्यास मदत होणार आहे, असं राहीबाईंनी या भेटी दरम्यान सांगितलं.