पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समिती ची निवडणूक दोन दिवसांपूर्वी पार पडली या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते सलीम खेतानी हेच पांढरकवडा राजकारणा चे किंग मेकर असल्याचे सिद्ध झाले.सलीम खेतानी हे मनमिळाऊ असून ते राजकारणात स्वतः कधी उभे राहत नाहीत पण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या समर्थक मित्र मंडळींना निवडणुकीत उभे करून त्यांना निवडून आणण्यास जीवाचे रान करतात हा इतिहास आहे.पूर्वी काँग्रेस च्या एका स्थानिक नेत्या सोबत बिनसल्या ने मग त्यांनी प्रहार कडून उमेदवार उभे केले.
प्रचारात जोरदार फिल्डिंग लावून नगरपरिषद एक हाती जिंकली.सलीम खेतानी हे खेतानी फाउंडेशन च्या माध्यमातून समाजातील गरीब गरजूंना मदत करतात
कोरोना चे संकट असो की नैसर्गिक आपत्ती त्यात ते सढळ हाताने मदत करतात.म्हणून येथील जनता त्यांच्या वर निस्वार्थ प्रेम करते नगर पालिकेत सत्ता मिळवल्या नंतर त्यांनी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पांढरकवडा शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर केली.आपल्या दानशूर स्वभावाने व प्रेमळ स्वभावाने सलीम खेतानी हे प्रचंड लोकप्रिय आहेत २०१९’२०२४ ला विधानसभा निवडणुकीत ते भाजप ला सपोर्टेड होते म्हणून भाजप चा विजय सुकर झाला हे नक्की.