भाषावार प्रांत रचना झाल्या वर देखील मुंबईला संयुक्त महाराष्ट्रात घेण्यासाठी मोठे आंदोलन झाले शेतको हुतात्मा झाले.तेव्हा पासून मराठी माणसाची मुंबई म्हणाल्या जाते पण हल्ली परप्रांतीय लोका कडून येथे मराठी माणसाला त्रास देण्याच्या घटना वाढीस लागला आहे.भाषा ही प्रांतीय अस्मिता असते.त्यात नव्या केंद्रीय शिक्षण धोरणा मुळे त्री भाषा सूत्रा नुसार इयत्ता पहिली पासून तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती चा आदेश महाराष्ट्र सरकारने काढला.वास्तविक इयत्ता पाचवी पासून हिंदी भाषा अभ्यासक्रमात आहेच पण पहिली पासून सक्ती नको म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला त्यात शिवसेना उबाठाने देखील विरोध केला.या एका मुद्द्यावर गेली २५ वर्ष वेगळे असनारे ठाकरे बंधू एकत्र येण्याचा मार्ग मोकळा झाला मोर्चा ची घोषणा झाली मात्र सरकारने तो जि आर रद्द केला तरी विजयी सभा आज होत आहे
आता भाषेवरून मुंबईत एका व्यापाऱ्यांस मारहाण झाली मनसे आक्रमक आहे त्यात सुनील केडीया नावाच्या एका व्यवसाईकांने मी मराठी शिकणार नाही व बोलणार नाही असे ट्विट केले व काय करायचे ते करा असे आव्हानच दिले व आगीत तेल ओतले.शांत असनाऱ्या। वातावरणात तेल ओतण्याचे काम केडीया ने केले यावर शिवसेना व मनसे आक्रमक झाले आता केडीया म्हणतो “मला वाचवा” ३० वर्ष मुंबईत राहून कशाला भानगडीत पडायचे इथले वातावरण खराब करायचे असा संतप्त सवाल आता महाराष्ट्र राज्यातील जनता विचारत आहे.केडीया ला जर चोप बसला तर त्यास तोच कारणीभूत असनार हे नक्की…!